शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम लँडर-प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावरील कडाक्याची थंडी सहन केली असेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 08:31 IST

रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. रोव्हर-लँडर सूर्यप्रकाशात वीज निर्माण करू शकतो.

नवी दिल्ली : निद्रिस्त ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होण्याची अपेक्षा आहे. १४ दिवसांच्या अंधारानंतर सूर्यकिरणे आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू लागली आहेत. अंधारामुळे लँडर आणि रोव्हरला ‘स्लीप मोड’वर ठेवण्यात आलेले आहे. इस्रो शुक्रवारी (दि. २२) त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, लँडर व रोव्हरचे सोलर पॅनल त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडताच काम करू शकतात. इस्रोने २ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. 

चंद्रयान-३ मोहीम केवळ १४ दिवसांचीचचंद्रयान-३ मोहीम केवळ १४ दिवसांसाठी आहे. कारण चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. म्हणजे चंद्रावर १४ दिवस अंधार असतो आणि १४ दिवस प्रकाश असतो. रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. रोव्हर-लँडर सूर्यप्रकाशात वीज निर्माण करू शकतो. परंतु रात्रीच्या वेळी वीज निर्मितीची प्रक्रिया थांबते. वीजनिर्मिती न झाल्यास, इलेक्ट्रॉनिक उपकरणे कडाक्याची थंडी सहन करू शकणार नाहीत व ती नादुरुस्त होतील. 

स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी : स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी लँडरने चंद्रावरील नवीन ठिकाणांची तपासणी केली होती. लँडरची सर्व उपकरणे बंद करण्यात आली आहेत. फक्त रिसीव्हर चालू आहे, जेणेकरून बंगळुरूहून कमांड घेतल्यानंतर ते पुन्हा काम करू शकेल. 

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3