शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 06:52 IST

भाैतिक संशाेधन प्रयाेगशाळा व ‘इस्राे’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या विवरात चांद्रयान उतरले आहे, ते ‘नेक्टरियन’ काळात बनले हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून इतिहास घडविला. भारताचे चांद्रयान चंद्रावरील सर्वात जुन्या विवरामध्ये उतरल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. हे विवर सुमारे ३.८५ अब्ज वर्षांपूर्वी बनले हाेते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चांद्र माेहीम आणि उपग्रहाने पाठविलेल्या विविध छायाचित्रांचे विश्लेषण करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाैतिक संशाेधन प्रयाेगशाळा व ‘इस्राे’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या विवरात चांद्रयान उतरले आहे, ते ‘नेक्टरियन’ काळात बनले हाेते. प्रयाेगशाळेचे ग्रहविज्ञान विभागाचे सहयाेगी प्राध्यापक एस. विजयन यांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या ठिकाणी चांद्रयान-३ उतरले आहे, ते एक अद्वितीय भूगर्भीय ठिकाण आहे. तेथे दुसरे मिशन पाेहाेचले नाही. 

कशी हाेते विवरांची निर्मिती?ज्वालामुखींचे स्फाेट किंवा उल्कापिंड धडकल्यामुळे झालेल्या खड्ड्यांना क्रेटर किंवा विवर म्हणतात. त्यातून निघालेली माती किंवा इतर वस्तूंना इजेक्टा म्हणतात. चांद्रयान २६ ऑगस्ट २०२३ राेजी जिथे उतरले, त्या स्थळाला शिवशक्ती पाॅइंट असे नाव देण्यात आले हाेते.

कसा विकसित झाला चंद्र?nया ठिकाणी प्रग्यान राेव्हरने जी छायाचित्रे घेतली, त्यावरून चंद्र कसा विकसित झाला, हे लक्षात येते. चांद्रयान-३ हे सुमारे १६० किलाेमीटर व्यासाच्या विवरात उतरले हाेते. nप्रग्यानच्या छायाचित्रात जे दिसले ताे कदाचित विवराचा अर्धा भाग असावा. उर्वरित भाग दक्षिण ध्रुवाच्या ‘ऐटकेन बेसिन’मधून निघालेल्या इजेक्टामध्ये दबला असावा, असे विजयन यांनी सांगितले. 

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3