शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:46 IST

देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे.

नवी दिल्ली - भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला.  भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही टाळ्या वाजवून आणि तिरंगा फडकवत या क्षणाचा आनंद साजरा केला.

देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. चांद्रयान ३ चे आज चंद्रावर सॉफ्ट लँडींग झालं. सायंकाळी ६.०४ वाजता चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि देशवासीयांचा उर अभिमानाने भरुन आला. इस्रोच्या कार्यालयासह देशभरात लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. इस्रो कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून दोन्ही हात वर करुन हा क्षण साजरा केला. यावेळी, इस्रोचे प्रमुख सोमनाथन यांनीही आनंद व्यक्त केला.

पंतप्रधाननरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी द. आफ्रिकेत आहेत. मोदी तेथूनच ह्या क्षणाचे साक्षीदार झाले आणि टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यानंतर तिरंगा ध्वज फडकावत मोदींनी चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा क्षण साजरा केला. देशवासीयांना या मोहिमेच्या यशस्वीतेचा अत्यानंद झाल्याचंही सोशल मीडियातून पाहायला मिळत आहे.   

चांद्रयान २ च्या अपयशामुळे धाकधूक

२०१९ साली भारताच्या चांद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चांद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती.

दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.  तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.  

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी