शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Chandrayaan-2 : राष्ट्रपती कसं व्हायचं?; विद्यार्थ्याच्या प्रश्नावर मोदी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 12:18 IST

ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोमध्ये आलेल्या विद्यार्थांशी मोदींनी संवाद साधला.

ठळक मुद्देऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोमध्ये आलेल्या विद्यार्थांशी मोदींनी संवाद साधला.उपस्थित विद्यार्थ्यांनी मोदींना प्रश्न विचारले. मोदींनी देखील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.एका विद्यार्थाने या चर्चेदरम्यान भविष्यात राष्ट्रपती व्हायचं आहे. त्यासाठी काय करू असे मोदींना विचारले.

बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (7 सप्टेंबर) चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली. तसेच देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. चांद्रयान-2 चं सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान इस्रोच्या नियंत्रण कक्षात आले होते. त्यावेळी  60 पेक्षा जास्त विद्यार्थी नियंत्रण कक्षात होते. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोमध्ये आलेल्या विद्यार्थांशी मोदींनी संवाद साधला. उपस्थित विद्यार्थ्यांनी मोदींना प्रश्न विचारले. मोदींनी देखील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

एका विद्यार्थाने या चर्चेदरम्यान भविष्यात राष्ट्रपती व्हायचं आहे. त्यासाठी काय करू असे मोदींना विचारले. हे ऐकताच मोदी यांनी त्या विद्यार्थ्याची पाठ थोपटत त्याला शाबासकी दिली. तसेच 'राष्ट्रपती का व्हायचंय? पंतप्रधान का नाही व्हायचंय?' असा प्रश्न विद्यार्थ्याला विचाराला. त्यावर उपस्थित विद्यार्थी हसायला लागले. तसेच एका विद्यार्थ्याने दृढनिश्चयी राहण्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न विचारला त्यावर लक्ष्य मोठे ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी जोडा. नकारात्मकता सोडून द्या असं उत्तर मोदींनी दिलं आहे. 

आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान आहे. चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो. चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता. विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका.  देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित केलं. इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. अडचणींमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही. लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही. आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार असल्याचं त्यांनी सांगितलं.

इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, संपर्क तुटल्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांचे चेहरे पडले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने देशाला पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. होप फॉर द बेस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक वाक्य इस्रोतील वैज्ञानिकांना आणि 130 कोटी भारतीयांना नवी ऊर्जा देणारं ठरलंय. चांद्रयान 2 मोहिमेतील शेवटचा टप्पा असलेल्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली होती. त्यावेळी, देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासियांचे मनोधैर्य वाढवले. चंद्रापासून केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं. 

 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थी