शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 09:37 IST

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र...

ठळक मुद्देऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावाविक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली

बंगळुरू -  चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच लूनर क्राफ्ट क्रॅश लँडिंगनंतर पूर्णपणे नष्ट झाल्याचा अंदाज इस्रोच्या शास्त्रज्ञांना आला होता. दरम्यान, ऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावा, असा अंदाज विक्रमला लँडिंगदरम्यान आलेल्या अपयशचा तपास करत असलेल्या टीमने वर्तवला आहे.   इस्रोमधील माहितगारांनी सांगितले की, ''1 हजार 471 किलोग्रॅम वजनाचा विक्रम लँडर आणि त्याच्यासोबत असलेला 27 किलो वजनाचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्टभागापासून काही अंतरावर असताना दुर्घटनाग्रस्त झाला. त्यानंतर विक्रमबाबत आतापर्यंत केलेल्या अभ्यासामधून विक्रम पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता फारच कमी आहे.'' दरम्यान, क्रॅश लँडिंगमुळे विक्रम उलटला असावा किंवा आडवा पडला असावा, पण त्याचे ओळखू न येण्याइतपत नुकसान झाले नसावे, असा अंदाज शास्रज्ञांनी बांधला आहे.  छायाचित्रांचा अभ्यास करणाऱ्या एका शास्रज्ञाने सांगितले की, ''आतापर्यंत मी पाहिले आहे त्या आधारावर सांगू शकतो की, लँडर विक्रमची सावली मला दिसली. विक्रम लँडर आपल्या पायांच्या दिशेन पडला नसावा असे मी निश्चितपणे सांगू शकतो. विक्रमच्या चार पायांचे नुकसान झाले आहेत. हे पाय वाकले असावेत किंवा त्यांचे नुकसान झाले असावे.'' तर विक्रमला आलेल्या अपयशाच्या अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, ''विक्रम चंद्राच्या पृष्टभागापासून दहा किमी अंतरावर असताना अनियंत्रित झाला होता. तसेच चंद्रापासून 330 मीटरवर असताना त्याचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता.''   दरम्यान, विक्रमच्या लँडिंग प्रोग्रॅममध्ये काहीतरी गडबड होती, असे आतापर्यंतच्या तपासानंतर वाटत आहे, असे दोन शास्रज्ञांनी सांगितले. विक्रमच लँडिंग प्रोग्रॅम यू.आर. राव. सॅटेलाइट सेंटर, बंगळुरू येथे लिहिण्यात आला होता. दरम्यान, ''लँडिंग प्रोग्रॅमचे योग्य पद्धतीने परीक्षण केले गेले होते की नाही, याची माहिती घेतली पाहिजे, असे एका शास्रज्ञाने सांगितले. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्टभागावर पोहोचण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वीपर्यंतचे अंतर आणि उंचीच्या आधारावर कंट्रोल निश्चित करण्याचा होता.'' असे एका शास्रज्ञाने सांगितले. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोIndiaभारत