शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Chandrayaan 2: प्रिय इस्रो प्रमुख के. शिवन यांस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 17:54 IST

अपयशानं उदास होऊ नका शिवन सर, मोठं यश तुमची वाट पाहतंय

प्रिय के. शिवन्,इस्रो चिफ....

मान खाली नको सर,मान कायम ताठ ठेवा!खरंच सांगतो आज तुमचा,देवालाही वाटेल हेवा!

के. शिवन् शास्त्रज्ञ पण,देव मानतोय प्रत्येक भारती!गाभाऱ्याकडे पाठ फिरवून,तुमच्यासमोर करतोय आरती!

दिसत नाही तिथे पोचणं,काम अब्जात एकाचं!म्हणून मस्तक ताठ हवं,देशाच्या या लेकाचं!

बंदरात येऊन जहाज बुडणं,नाविकाला नक्कीच छळतं!पण् बंदरावरती घेऊन आला ,फक्त अथांगालाच कळतं!

तुमची मान झुकली म्हणून,अख्खा देश रडला आहे!तुमच्या डोळ्यात पूर्ण भारत,अश्रू होऊन दडला आहे!

तुमची मान खाली बघून,साक्षात यश रडते आहे!तुमच्या हातून काहीतरी,खरंच अद्भूत घडते आहे!

डोळ्यामधलं आजचं पाणी,उद्या ठरेल स्टीम पॉवर!तेव्हा सांगतो साक्षात् अमृत,तीर्थ बनून होईल शॉवर!

शिवन् सर, तुमची मान,शारदेचं प्रतिक आहे!तुमची झेप अलौकिकच,पंख जरी लौकिक आहे!

चंद्र सोडाच,मंगळ-गुरू,तुमच्या कक्षेत फिरू लागतील!तुमच्याच लँडरमधे तिथली,माती, जीव शिरू लागतील!

तो दिवस दूर नाही,फक्त आधी पुसा पापणी!नऊ ग्रह गाऊ लागतील,एका सुरात "इस्रो-गाणी!"

- प्रमोद जोशी, देवगड

टॅग्स :K. Sivanके. सिवनChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो