शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2 : चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 09:06 IST

चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली. तसेच देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत मोदींनी रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे.

ठळक मुद्देइस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे - नरेंद्र मोदी'चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून दृढ झाली''देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही.'

बंगळुरू - चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली. तसेच देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत मोदींनी रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका.  देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित केलं. 

इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. अडचणींमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही. लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही. आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

भारतीय चांद्रयान-2 चे विक्रम हे लँडर शनिवारी (7 सप्टेंबर) पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात होते. मात्र याच दरम्यान ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला.इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, संपर्क तुटल्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांचे चेहरे पडले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने देशाला पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. 

होप फॉर द बेस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक वाक्य इस्रोतील वैज्ञानिकांना आणि 130 कोटी भारतीयांना नवी ऊर्जा देणारं ठरलंय. चांद्रयान 2 मोहिमेतील शेवटचा टप्पा असलेल्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली होती. त्यावेळी, देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासियांचे मनोधैर्य वाढवले. चंद्रापासून केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं. 

होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे. तुम्ही देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे मोदींनी म्हटले. मोदींचे एक मिनिटांचे ते भाषण देशावासियांना नवी ऊर्जा देऊन गेलंय. त्यानंतर, मोदींनी ट्विट करुनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. हा क्षण अतिशय धाडसाचा आणि धैर्याचा आहे. आपण ते धैर्य ठेऊच,  इस्रोचे चेअरमन चांद्रयान 2 मोहिमेबद्दल माहिती देत असून आपण मोहिमेच्या चांगल्या पहाटेची आशा ठेऊया, असे ट्विट मोदींनी केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत