शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan 2 : मोदींच्या 'त्या' एका वाक्यानं ISRO सह देशवासियांना 'नवी उमेद' मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 06:33 IST

देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेटवच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे.

भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, संपर्क तुटल्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांचे चेहरे पडले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने देशाला पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. तर इस्रोतील शास्त्रज्ञांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

होप फॉर द बेस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक वाक्य इस्रोतील वैज्ञानिकांना आणि 130 कोटी भारतीयांना नवी ऊर्जा देणारं ठरलंय. चांद्रयान 2 मोहिमेतील शेवटचा टप्पा असलेल्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली होती. त्यावेळी, देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासियांचे मनोधैर्य वाढवले. 

चंद्रापासून केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं.  होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे. तुम्ही देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे मोदींनी म्हटले. मोदींचे एक मिनिटांचे ते भाषण देशावासियांना नवी ऊर्जा देऊन गेलंय. त्यानंतर, मोदींनी ट्विट करुनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. हा क्षण अतिशय धाडसाचा आणि धैर्याचा आहे. आपण ते धैर्य ठेऊच,  इस्रोचे चेअरमन चांद्रयान 2 मोहिमेबद्दल माहिती देत असून आपण मोहिमेच्या चांगल्या पहाटेची आशा ठेऊया, असे ट्विट मोदींनी केलं आहे.  

टॅग्स :isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदीChandrayaan 2चांद्रयान-2Bengaluruबेंगळूर