शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2: इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम 95% यशस्वी; जाणून घ्या कशी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 16:02 IST

विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरीही भारताच्या हाती मोठं यश

बंगळुरू: इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारतासमोर होती. मात्र या यशानं इस्रोला थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र यानंतरही इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम 95 टक्के यशस्वी झाली आहे. इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क मध्यरात्री तुटला. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विक्रमच्या लँडिंगआधीच भारताला बरंच मोठं यश मिळालं. चंद्राच्या कक्षेत असलेलं इस्त्रोचं ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असल्यानं चांद्रयान-2 मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचं मत इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन यांनी व्यक्त केलं. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असेपर्यंत लँडर विक्रम संपर्कात होतं. मात्र त्यानंतर विक्रम आणि इस्त्रोचा संपर्क तुटला. चंद्रायान-2 चं ऑर्बिटर अगदी योग्य ठिकाणी असून त्याचं काम अतिशय योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं माधवन म्हणाले. 'आपण फार चिंता करू नये असं मला वाटतं. चांद्रयान-2 नं त्याचं 95 टक्के काम केलेलं आहे. चंद्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्याचं काम ऑर्बिटर व्यवस्थित पार पाडेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय विक्रमनं हार्ड लँडिंग केलं असलं, तरी त्यावरील बाह्य उपकरणांनी त्याची निरीक्षणं घेता येतील. यामध्ये लेजर मिरर, सिसमोग्राफ, उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या यानातूनही अधिकची माहिती मिळेल.चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर तब्बल 3,84,400 किलोमीटर इतकं आहे. चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचा संपर्क चंद्रापासून 2.1 किमी अंतरावर असताना तुटला. चांद्रयान-2नं यशस्वीपणे कापलेलं हे अंतर विचारात घेतल्यास इस्रोच्या यशाची कल्पना येऊ शकेल. त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांची कामगिरी नक्कीच देशवासीयांची मान अभिमानानं उंचावणारी आहे.  

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो