शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर कंबार यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 15:53 IST

​​​​​​​यू. आर अनंतमूर्ती यांच्या अध्यक्षीय पदाच्या निवडीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी साहित्य अकादमीच्या इतिहासात दुसऱ्यांदा ही निवडणूक झाली.

पुणे :  भारतीय भाषांचे संवर्धन करणा-या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची  निवड झाली. पंचवीस वर्षांनंतर अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे.  ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि ‘कोसला’ कार महाराष्ट्रीयन साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा  पराभव करीत त्यांनी अध्यक्षपदावर आपले नाव कोरले तर  उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक निवडून आले.यू. आर अनंतमूर्ती यांच्या अध्यक्षीय पदाच्या निवडीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी साहित्य अकादमीच्या इतिहासात दुस-यांदा ही निवडणूक झाली. अकादमीच्या जनरल कौन्सिलच्या 99 सदस्यांनी पाच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली. या निवडणूकीत चंद्रशेखर कंबार  यांनी 56 मतांनी आपले स्थान बळकट केले तर ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना 29 मते आणि भालचंद्र नेमाडे यांना केवळ 4 च मते पडली.  विनायक कृष्णा गोकाक (1983) आणि यू.आर अनंतमूर्ती (1993) यांच्यानंतर तिस-या कन्नड साहित्यिकाची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कवी, लेखक, दिग्दर्शक असे प्रा. चंद्रशेखर कंबार  यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. अकादमीच्या नियामक मंडळाचे गेल्या दहा वर्षांपासून सदस्य आहेत. 2013-2018 कालावधीत त्यांनी अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले. ’पद्मश्री’ सारख्या सन्मानाचे ते मानकरी ठरले असून, कबीर सन्मान,कालिदास सन्मानाचे ते मानकरी ठरले आहेत. 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य