शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडूंची ३१ महिन्यानंतर पूर्ण झाली शपथ; पवन कल्याण यांच्यामुळं 'या' नेत्यानं बदललं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:09 IST

मुख्यमंत्री म्हणून परत येईपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ चंद्राबाबू नायडू यांनी घेतली होती.

अमरावती : आंध्र प्रदेशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत आमदारांनी शपथ घेतली. यापूर्वी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली होती. दरम्यान, ३१ महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी एक शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवले आहे. मुख्यमंत्री म्हणून परत येईपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ चंद्राबाबू नायडू यांनी घेतली होती.

शुक्रवारी विधानसभेत टीडीपीसह मित्रपक्ष जनसेना व भाजपच्या आमदारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या चंद्राबाबू नायडू यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शपथ घेतली. पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले जनसेना नेते आणि अभिनेता पवन कल्याण यांची चंद्राबाबू नायडू यांनी गळाभेट घेतली. उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे आमदार म्हणून शपथ घेणारे दुसरे व्यक्ती होते. यानंतर विधानसभेतील नवा चेहरा असलेले चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली.

सर्व मंत्र्यांनंतर वायएसआरसीपी प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी आमदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान, जगन मोहन रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन करताना दिसले. मात्र, अधिवेशन सुरू झाले, तेव्हा जगन मोहन रेड्डी उपस्थित नव्हते. ते पाच मिनिटे उशिराने विधानसभेच्या आवारात पोहोचले. शपथ घेतल्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपी-जनसेना-भाजप युतीने १७५ सदस्यीय विधानसभेत १६४ जागा जिंकल्या. 

नेत्याने नाव बदललेदरम्यान, वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते मुद्रागदा पद्मनाभम यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसेना प्रमुख पवन कल्याण यांचा पराभव करण्याचे आश्वासन दिले होते. तसे न केल्यास आपले नाव बदलू, असे त्यांनी वचन दिले होते. मात्र, या निवडणुकीत मुद्रागदा पद्मनाभम यांचाच पराभव झाला. त्यामुळे त्यांनी दिलेले वचन पूर्ण करत अधिकृतपणे आपले नाव बदलून 'पद्मनाभ रेड्डी' असे ठेवले आहे. पीठापुरम विधानसभा मतदारसंघात पवन कल्याण यांच्या विजयानंतर ७० वर्षीय रेड्डी यांनी नाव बदलले आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश