शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता पलटली अन् चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 12:01 IST

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राज्यातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री चंद्राबाबू नायडू यांची तपासणी करण्यात आली. तसेच, त्यांना विमानापर्यंत देण्यात येणाऱ्या व्हीआयपी सुविधेपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले. त्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रवाशांच्या शटल बसमधून प्रवास करावा लागला. 

आंध्र प्रदेश विधानसभेत विरोधीपक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये 24 तास त्यांच्यासोबत 23 सुरक्षा कर्मचारी आणि एस्कॉर्टच्या गाड्या असतात. 2003 मध्ये तिरुपती येथील अलिपिरीमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. 

दरम्यान, काल विमानतळावर चंद्राबाबू नायडू यांची तपासणी केल्याप्रकरणी टीडीपीने नाराजी व्यक्त केली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत अशाप्रकारे व्यवहार करणे चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. भाजपा आणि व्हायएसआर काँग्रेस पार्टी सुडाचे राजकारण करत आहे, असा आरोपही टीडीपीने केला आहे. 

टीडीपी नेता आणि राज्यातील माजी गृहमंत्री चिन्ना राजप्पा यांनी सांगितले की, 'अधिकाऱ्यांची वागणूक फक्त चंद्राबाबू नायडू यांचा अपमान करण्यासारखी नव्हती तर त्यांनी झेड प्लस सुरक्षा असताना त्यांच्या सुरक्षेतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह केले. चंद्राबाबू नायडू यांना अशा परिस्थितीचा सामना करणं हे खूपच संतापजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षिततेबाबत निर्णय घ्यावा.' 

चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षनेते...आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला. त्या पक्षाचे केवळ २३ उमेदवारच विधानसभेवर निवडून आले आहेत.चंद्राबाबू नायडू राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. तेलगू देसम आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडून आलेले आमदार आणि पक्षाचे तीन खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करण्यात आला. त्यानंतर,  चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून खासदार गल्ला जयदेव यांची नेमणूक केली. लोकसभेतील नेता म्हणून के. राजमोहन नायडू, तर राज्यसभेतील नेता म्हणून के. सत्यनारायण चौधरी यांचीही त्यांनी नियुक्ती केली.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश