शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

केसीआर आणि जगनमोहन रेड्डी मोदींचे पाळीव कुत्रे - चंद्राबाबू नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 10:59 IST

जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.  

कृष्णा : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी प्रचाराची धार तीव्र होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.  

मचिलीपटनम येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन. चंद्राबाबू म्हणाले, "जगनमोहन रेड्डी कुत्र्याची बिस्किटे खात आहेत. तिच बिस्किटे आपल्याला वाटत आहेत. जगनमोहन आणि केसीआर मोदींचे पाळीव कुत्रे आहेत, जे एका बिस्किटासाठी आपले गुडघे टेकून बसतील. सावध राहा, जगनमोहन हे बिस्किट तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करतील."

व्हायएसआर काँग्रेस पार्टीला फंड दिल्याचा आरोप एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आणि टीआरएसवर केला आहे. मोदी आणि केसीआर यांनी 1000 करोड रुपये खर्च केले आहेत. केसीआर तुम्ही हे पैसे का खर्च केले? तुम्ही आपल्या राज्याचा पैसा आमच्या येथे का खर्च करत आहात. करोडो रुपये खर्च केल्यानंतरही राज्यात तुम्हाला मते मिळणार नाहीत, असे एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले.

 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. येत्या 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.  

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAndhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019