शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

…तर तरुणांना रात्री घरातच ठेवलं पाहिजे – किरण खेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 21:41 IST

चंदीगडमध्ये आयएएस अधिका-याच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपाच्या खासदार किरण खेर यांनी या वादात उडी घेतली आहे.

नवी दिल्ली, दि. 9 - चंदीगडमध्ये आयएएस अधिका-याच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपाच्या खासदार किरण खेर यांनी या वादात उडी घेतली आहे. मुली व मुलांमध्ये भेदभाव न करता दोघांनाही सारखेच नियम लावायला हवेत. रात्रीच्या दरम्यान एकट्या मुलीनं रस्त्यावर फिरणे चुकीचं वाटत असल्यास तरुणांनाही रात्री घराबाहेर पडू न देता घरातच ठेवलं पाहिजे, असं मत किरण खेर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच तरुणींना दिवसाची भीती वाटत नाही, मग रात्रीचीच भीती का वाटते ?, त्यामुळे रात्रीचं मुलांना घराबाहेर पाठवू नका, असा सल्लाही किरण खेर यांनी दिला आहे. आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचे सुपुत्र विकास बराला याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक केलीय. पोलिसांनी चौकशीसाठी विकासला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दुपारी अडीच वाजता विकास बराला पोलीस ठाण्यात पोहोचला होता. चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. विकास बरालाविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून, सीसीटीव्हीत विकास बराला वर्णिकाचा पाठलाग करताना स्पष्ट दिसत आहे.काय आहे प्रकरण -हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं.