शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता; माजी मुख्यमंत्री पक्षावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 22:58 IST

जगदीश शेट्टर हे हुबळीचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गेल्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांनी 21,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. भाजप हा गड जिंकण्यासाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. मात्र, आता येथील विधानसभा निवडणुकीला महिनाभरापेक्षाही कमी कालावधी उरला असताना, पक्षात मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. येथील सहा वेळचे भाजप आमदार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी पक्षाचा निर्णय मान्य करण्यास नकार दिला आहे. पक्षनेतृत्वाने आपल्याला तिकीट देणार नसल्याचे म्हटले असून इतरांसाठी मार्ग प्रशस्त करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेट्टार हे 2012 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. महत्वाचे म्हणजे, कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने आपली 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जगदीश शेट्टार यांचे नाव नाही.

सहा वेळा जिंकली आहे विधानसभा निवडणूकजगदीश शेट्टर हे हुबळीचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गेल्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांनी 21,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. यावेळी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे महेश नलवाड यांचा पराभव केला होता. पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले, गेल्या सहा निवडणुकांमध्ये आपण सातत्याने विजयी होत आलो आहोत आणि प्रत्येक वेळी आपल्या विजयातील अंतर 21,000 मतांपेक्षाही अधिक राहिले आहे. मग माझ्यात कमी काय आहे? 

माझी चूक काय? -जगदीश शेट्टार म्हणाले, माझी राजकीय कारकीर्द पूर्णपणे स्थिर आहे. मला यावेळीही निवडणूक लढू द्यावी अशी विनंती आपण पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. शेट्टर म्हणाले, मला केवळ एकच विचारायचे आहे की, मी सहा वेळा विजयी झालो आहे. माझ्या राजकीय जीवनात मी कधीही झटके खाल्लेले नाहीत आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही. मग मला बाजूला का केले जात आहे? एवढेच नाही, तर पक्षाने मला एकदा निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अन्यथा पक्षासाठी बरे होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण ते बंडखोरीच्या मनस्थितीत दिसत होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटकElectionनिवडणूकBJPभाजपा