काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

By देवेश फडके | Published: February 10, 2021 11:30 AM2021-02-10T11:30:12+5:302021-02-10T11:39:46+5:30

प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

chamoli disaster survivors recount nightmarish tales their experience | काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

Next
ठळक मुद्देचमोली दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी कथन केला रोमांचकारी अनुभवगाणी, व्यायाम यांनी दिला धीरआयटीबीपीच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले

चमोली : उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतीय लष्करासह एनडीआरएफ, आयटीबीपीचे जवान दिवस-रात्र मदतकार्य करत आहे. या दुर्घटनेतील १९७ जण अद्यापही बेपत्ता असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. (chamoli disaster survivors recount nightmarish tales their experience)

तपोवन येथे भूमिगत बोगद्यात काही कर्मचारी अडकले होते. त्यातील १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या पथकाने या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी अक्षरशः अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे हे कर्मचारी सुमारे १० तास जीवन-मृत्यूशी लढा देत होते. 

गाण्यांनी दिला मोठा आधार

चमोली दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा सर्व आशा संपुष्टात आल्या, तेव्हा आम्ही गाणी म्हणायला सुरुवात केली. गढवाली आणि नेपाली भाषेतील गाणी म्हटली. जोरजोरात म्हटली. एकमेकांना शायरी ऐकवली आणि आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी हरसंभव प्रयत्न केले. सुमारे ७ तास आम्ही गाणी म्हणत होतो, असा रोमांचकारी अनुभव त्यांनी सांगितला.

आयटीबीपी पथकाने वाचवले

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बर्फाळ पाणी आमच्या बुटांमध्ये शिरले होते. त्यामुळे चालताना अडचणी येत होत्या. थंडीमुळे शरीर थरथरत होते. गाणी म्हणत असताना आम्ही व्यायाम करायला सुरुवात केली. व्यायामुळे शरीर उबदार राहण्यास मदत झाली. तीन ते चार तास असेच घालवले. आमच्या मोबाइलवरून संपर्क साधण्याचेही काही प्रयत्न केले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता आयटीबीपीचे पथक आले आणि आम्हांला सुखरूप बाहेर काढले. 

नेपाळी कामगारांचा अनुभव

हिमकडा कोसळल्यानंतर पाणी भूयारात शिरले. पाणी दोन मीटरपर्यंत वाढले, तेव्हा आम्ही स्टीलच्या काठीचा वापर करून वरती राहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा स्तर कमी झाल्यानंतर काही तास रांगत पुढे गेलो. मात्र, मलबा असल्याने पुढे जाण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर आम्ही कंपनीशी संपर्क साधून आतील परिस्थितीबाबत सूचना दिल्या. त्यामुळे आयटीबीपी पथक सतर्क झाले आणि पुढे येऊन आम्हांला वाचवले.

Web Title: chamoli disaster survivors recount nightmarish tales their experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.