शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

भूजमध्ये काँग्रेससमोर आव्हान, देशातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:46 IST

भूज : देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या भूजमध्ये (गुजरात) भाजपची स्थिती आधीपासून चांगली दिसत आहे.

- विकास मिश्रभूज : देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या भूजमध्ये (गुजरात) भाजपची स्थिती आधीपासून चांगली दिसत आहे. तथापि, काँग्रेससाठी आव्हानांचा मुकाबला करणे म्हणावे, तेवढे सोपे दिसत नाही. भूज जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत पाटीदार समुदायाचे संख्यात्मकदृष्ट्या वर्चस्व आहे. तथापि, पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांचा प्रभाव जाणवत नाही. २०१२ च्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यातील ६ पैकी विधानसभेच्या ५ जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे आजवर पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकता आलेल्या नाहीत.स्थिती काय आहे?भूज जिल्ह्यातील अबदासा या विधानसभा मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे राष्टÑीय प्रवक्ते शक्तिसिंह गोहील विजयी झाले होते. यावेळी मात्र ते मांडवी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उभे ठाकले आहेत. अबदासा मतदारसंघातून सलग दोनदा कोणीही जिंकून आलेले नाही. त्यामुळे गोहील यांनी यावेळी मांडवी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. याच मतदारसंघातून भाजपने छबी पटेल यांना उमेदवारी देत त्या हमखास विजयी होतील, यादृष्टीने चोख व्यवस्थाही केली आहे. यासाठी नखतराणामधील काही भाग अबदासा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आहे. आधी नखतराणामधील काही भाग भूज आणि मांडवी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट होता. नखतराणा क्षेत्रात पाटीदार समुदायाचा बोलबाला आहे. पाटीदार समुदायाची मते छबी पटेल यांनाच मिळतील, अशी भाजपला आशा आहे.छबी पटेल हे मागील दोन वर्षांपासून सक्रिय आहेत. हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाचाही या मतदारसंघात फारसा प्रभाव दिसत नाही. येथील पाटीदार समुदाय संपन्न असून, बव्हंशी कुटुंबांतील लोक नागपूर, नाशिक आणि पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी येथे येऊन मतदान करावे, यासाठी छबी पटेल हे प्रयत्न करतील.या विधानसभा मतदारसंघातील २४ गावांत कडवा आणि लेवा पाटील समुदायाचे वर्चस्व आहे. लेवा पटेल समुदायातील अनेक कुटुंबे एनआरआय असल्याने त्यांना आरक्षणाबाबत फारसे स्वारस्य नाही. पटेल समुदायात काही मुद्यांवर मतभेद असले तरी हिंदुत्वाच्या मुद्यावर पटेल समुदाय एकजूट होतो. या गावांत निमाबेन यांना चांगला प्रतिसाद मिळेल. शहरी भागात थोडासा विरोध असला तरी हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांना चांगला फायदा मिळेल.>सामाजिक धुव्रीकरणभूज विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा निमाबेन आचार्य यांना उमेदवारी दिली आहे. तथापि, विद्यमान आमदाराविरुद्ध नाराजीची चर्चा ऐकण्यात येते. असे असले तरी निमाबेन यांचा विजय पक्का मानला जातो.काँग्रेसने मुस्लीम समाजाचे आदम चाकी यांंना भाजपा उमेदवाराविरुद्ध मैदानात उतरविले आहे. निमाबेन यांच्यावर नाराज असलेले लोक भाजपलाच मते देतील, असे या ठिकाणी जबरदस्त सामाजिक धुव्रीकरण झालेले दिसते.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह