शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

दिल्लीतील ६७ जागा राखण्याचे ‘आप’पुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 07:04 IST

२०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांना पुन्हा सत्तेत येण्याची खात्री आहे.

विकास झाडे नवी दिल्ली : पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांना पुन्हा सत्तेत येण्याची खात्री आहे. गेल्या वेळी तीन जागा मिळविणा-या भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून संपूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे ८ फेब्रुवारीला होणा-या निवडणुकीत कोण व कशी बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.केजरीवाल यांना २०११-१२ मध्ये घराघरात ओळख मिळाली. त्यांची साधी राहणी, संवादशैली लोकांना इतकी भावली की त्यांनी केजरीवाल व आपला स्वीकारले. दिल्ली विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसचा पराभव झाला. तेव्हा कॉँग्रेसला जेमतेम ८ जागा मिळाल्या आणि ७० जागांपैकी ३१ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.आपचे उमेदवार २८ जागांवर विजयी झाले. सरकार स्थापनेसाठी ३६ आमदार हवे होते. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांच्यासोबत कोणीही गेले नाही. पुन्हा निवडणुका नको म्हणून केजरीवाल यांनी कॉँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवले. मात्र, ४९ दिवसांतच केजरीवालांना राजीनामा द्यावा लागला. या अल्प काळात त्यांनी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरीपाठवले. केजरीवालांची केवळ दीड महिन्यातील कामे दिल्लीकरांच्या पसंतीस उतरली.पुढे २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा केंद्रात मोदी आल्यामुळे दिल्लीतही भाजपची सत्ता येईल, असे अंदाज व्यक्त झाले. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी दिल्ली पिंजून काढली; परंतु ७० पैकी तब्बल ६७ जागांवर आम आदमी पार्टी विजयी झाली. भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावेलागले.केजरीवालांनी पाच वर्षांत सर्वोत्तम सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनिक, आरोग्य सेवा, मोफत पाणी, २०० युनिटपर्यंत मोफत वीज, महिलांना बसमध्ये मोफत प्रवास, शहिदांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत व तातडीने नोकरी, शेतकºयांना कर्जमाफी, खासगी शाळांमध्ये गरिबांना प्रवेश, तीर्थयात्रा योजना, सीसीटीव्हीचे जाळे, मोफत वायफाय अशा अनेक गोष्टी करून दाखवल्या. विरोधकांकडे केजरीवालांच्या विरोधात बोलण्यासारखे विशेष मुद्दे नाहीत किंवा कोणतेही भ्रष्टाचाराचे प्रकरण काढता आले नाही.>लगे रहो केजरीवालदिल्लीमध्ये आजचे चित्र ‘अच्छे बिते पाँच साल, लगे रहो केजरीवाल’ या आम आदमी पक्षाच्या घोषणेसारखे असले तरी दिल्लीतील सर्वात मोठा प्रश्न प्रदूषणाचा आहे. केजरीवालांनी दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यासाठी हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला; परंतु या राज्यांनी दाद दिली नाही.केंद्र सरकारनेही उपाययोजना केली नाही. दिल्लीकरांची प्राथमिकता ही मोकळी आणि शुद्ध हवा आहे. ते देण्याचा विश्वास जो देईल त्याची दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सरशी ठरणार आहे. तरीही कॉँग्रेसला शून्यावरून दोन आकडी संख्या गाठणे, भाजपला ३ वरून ३० पर्यंत पोहोचणे आणि आम आदमी पार्टीला ६७ हा आकडा टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे.>दिल्लीतील पराभव भाजपला जिव्हारी लागला. केंद्रातील शक्ती वापरून केजरीवालांना काम करता येणार नाही याचाही प्रयत्न भाजपतर्फे झाला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल