नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालय जूनमध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लढणारी एचपीव्ही लस समाविष्ट करणार असून, त्यासाठी एप्रिलमध्ये जागतिक निविदा काढण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. सीरम इन्स्टिट्यूटची स्वदेशी एचपीव्ही लस ‘सेराव्हॅक’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २४ जानेवारी रोजी लाँच केली होती. “हे डोस २०२६पर्यंत पुरविले जातील. देशांतर्गत उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाव्यतिरिक्त, जागतिक लस उत्पादक कंपनी मर्कदेखील या निविदेच्या शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता आहे,” असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय एचपीव्ही लसीच्या तुलनेत ‘सेराव्हॅक’ची किंमत परवडणारी असेल, असे प्रकाश कुमार सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते. सध्या, एचपीव्ही लसींसाठी भारत पूर्णपणे परदेशी उत्पादकांवर अवलंबून आहे. जागतिक स्तरावर, तीन परदेशी कंपन्या एचपीव्ही लस तयार करतात, त्यापैकी दोन त्यांचे डोस भारतात विकतात.
Health: गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील लस लवकरच येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:30 IST