शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधील एका गटाला पंतप्रधानपदी मोदी नकोसे - मधुर भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:12 IST

त्याला विरोध करण्यासाठी अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरा गट निर्माण झाला.

नवी दिल्ली: पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींची झालेली निवड ही बॉलीवूडमधील एका गटाला रुचलेली नसल्याचा गौप्यस्फोट प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केला. छत्तीसढच्या भिलाई येथील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी म्हटले की, बॉलिवूडमधील अनेकांच्या मनात मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याची सल अजूनही आले. या गटात अभिनेते, दिग्दर्शक आणि अनेक निर्मात्यांचा समावेश आहे. त्यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी बॉलिवूडमध्ये दोन तट पडले होते. बॉलिवूडमधील जवळपास 40 ते 50 जण नरेंद्र मोदींविरोधात एकटवले होते. मोदी पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्नही केल्याचे मधुर भांडारकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी या लोकांकडून मोदींविरोधात पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु होते. तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरा गट निर्माण झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मोठ्याप्रमाणावर राजकारण करतात. याच लोकांकडून 'इंदू सरकार' चित्रपटाच्यावेळी माझ्यावर आरोप करण्यात आले होते. इंदू सरकारच्या निर्मितीसाठी केवळ सहा कोटी रूपये खर्च आला. अशावेळी भाजपाने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत पुरविली होती, हा आरोप खूपच हास्यास्पद आहे. भविष्यात मला एखाद्या बिग बजेट चित्रपटासाठी मदत लागलीच तर मी नक्कीच भाजपाकडे जाईन, असा टोलाही यावेळी मधुर भांडारकर यांनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhur Bhandarkarमधुर भांडारकर bollywoodबॉलिवूड