शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतमालासाठी एका फोनवर मिळेल ट्रक; केंद्राच्या ‘कृषी रथ अ‍ॅप’ने शेतकऱ्यांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 01:41 IST

शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रक बुक करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘कृषी रथ’ नावाचे नवे मोबाईल अ‍ॅप सुरु केले

नवी दिल्ली : प्रवासासाठी टॅक्सी बुक करण्याच्या उबर किंवा ओला अ‍ॅपच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रक बुक करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘कृषी रथ’ नावाचे नवे मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे. या अ‍ॅपचा उपयोग करून शेतकरी त्याच्या मोबाईल फोनवरून घरबसल्या ट्रक बुक करू शकेल व हा ट्रक त्याच्या दारात येऊन त्याचा शेतमाल बाजारात घेऊन जाईल.केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काही दिवसांपूर्वी या ‘कृषी रथ अ‍ॅप’चा औपचारिक शुभारंभ केला. खास करून सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात रब्बी हंगामात तयार झालेला शेतमाल घाऊक व्यापारी किंवा बाजार समित्यांपर्यंत घेऊन जाण्यास यामुळे शेतकºयांची खूूप सोय होईल. हे अ‍ॅप गुगल अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल.या अ‍ॅपच्या सेवेसाठी सध्या ५.२ लाख ट्रक व २० हजार ट्रॅक्टरची नोदणी झालेली आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर शेतकºयाला त्यात आपल्याला किती वजनाचा माल कुठून कुठे पाठवायचा आहे याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर त्याला त्या भागात उपलब्ध असलेला ट्रक व त्याचे अपेक्षित भाडे याची माहिती कळविली जाईल.वाटाघाटी करून भाडे ठरले की ट्रक बूक होईल. ट्रकचे भाडे बूकिंग करताना किंवा मालाची वाहतूक झाल्यावर दिले जाऊ शकेल.यामुळे एकाच रस्त्याने एकाच दिशेने जाणारा ट्रक अनेक शेतकºयांचा माल घेऊन जाऊ शकेल. याने शेतकरी व वाहतूकदार या दोघांचाही फायदा होईल. शेतकºयाला पूर्ण ट्रकचे भाडे देण्याऐवजी मालाचे जेवढे वजन असेल तेवढेच भाडे द्यावे लागेल. वाहतूकदारालाही पूर्ण क्षमतेने माल भरून वाहतूक करणे किफायतशीर ठरेल.डाळी, तेलबियांची खरेदी‘लॉकडाऊन’ असूनही ‘नाफेड’व भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) या केंद्र सरकारच्या संस्थांनी रब्बी हंगामातील डाळी, कडधान्ये व तेलबियांची हमी भावाने जोरदार खरेदी सुरु ठेवली आहे.कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १६ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह सात राज्यांत एक लाख १४ हजार ३३८ शेतकºयांकडून १.३३ लाख टन डाळी व २९,२६४ टन तेलबियांची थेट खरेदी केली.या खरेदीचे एकूण मूल्य ७८४ कोटी रुपये आहे. या खेरीज महाराष्ट्रासह चार राज्यांत ‘प्राईस स्टॅबिलायजेशन फंड’ योजनेखाली ५.३२ लाख टन तुरीचीही खरेदी थेट शेतकºयांकडून केली गेली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी