शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: देशात कोरोना लसींचा तुटवडा; मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:34 IST

केंद्राचा निर्णय : दुसरी ‘मेड इन इंडिया’ लस; बुक केले ३० कोटी डोस

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीनंतर भारतास हैदराबाद येथील ‘बायलॉजिकल-ई’ कंपनीची दुसरी ‘मेड इन इंडिया’ लस उपलब्ध होणार आहे. सध्या चाचण्या सुरू असलेल्या या लसीचे ३० कोटी डोस केंद्र सरकारने बुक केले असून, त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून १,५०० कोटी रुपयांचा ॲडव्हॉन्स दिला जाणार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, बायलॉजिकल - ईकडून ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान लसीचे उत्पादन व साठवणूक केली जाणार आहे. काही महिन्यांत ही लस उपलब्ध होईल. बायलॉजिकल - ईची लस सध्या वैद्यकीय चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग चाचण्यांत सहभागी असून, कंपनीला १०० कोटी रुपयांचे अर्थसाह्य सरकारकडून करण्यात आले आहे. सुत्रांनी सांगितले की, बायलॉजिकल - ईने जॉन्सन अँड जॉन्सच्या कोविड लसीचे वार्षिक ६०० दशलक्ष डोस उत्पादित करण्याचा स्वतंत्र करारही केलेला आहे.सीरम करणार ‘स्पुतनिक-व्ही’चे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीचे उत्पादन करण्याच्या परवानगीसाठी भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय)  अर्ज केला आहे. भारतात ही लस सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरॅटरीजकडून उत्पादित केली जात आहे. दरम्यान, कोविशिल्ड लसीचे १० कोटी डोस आपण जूनमध्ये पुरवू शकू, असे ‘सीरम’ने केंद्र सरकारला कळविले आहे. कंपनीकडून नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादनही केले जात असून, या लसीची अमेरिकेच्या औषधी नियंत्रकांची परवानगी प्रतीक्षेत आहे. देशातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सरकारकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच सरकार विविध कंपन्याकडून लस खरेदी करीत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस