शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:20 IST

याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल.

बांगलादेशातहिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांसोबतच अनेक नेत्यांनाही तेथील हिंदूंच्या सुरक्षितते प्रति चिंता व्यक्त केली आहे. यातच आता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (11 डिसेंबर) केंद्र सरकारकडे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. याच बरोबर बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना आणावे, असेही ममता यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री ममता जगन्नाथ मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी दीघाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, "केंद्राने हिंसाग्रस्त बांगलादेशात अल्पसंख्यकांना सुरक्षितता द्यायला हवी. तसेच, ज्यांची परत येण्याची इच्छा असेल, त्यांना परत आणायला हवे. आम्हाला बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा हवी आहे, यासंदर्भात केंद्राने कारवाई करावी."

"काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत आहेत" -याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल.

हिंदूंवर होतायत हल्ले -  बांगलादेशच्या 17 कोटी लोकसंखेत 8 टक्के अल्पसंख्याक हिंदू आहेत. या हिंदूंना 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या पतनानंतर 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. हिंदू धर्माला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत अनेक मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, मंदिरातील मूर्तींचीही मोडतोड करण्यात आली आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशMamata Banerjeeममता बॅनर्जीHinduहिंदूCentral Governmentकेंद्र सरकार