शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात 4 दिवसच करा काम; तीन दिवस सुट्ट्यांचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:28 IST

कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायद्यांची लवकर अंमलबजावणी होणार आहे. ते लागू झाल्यास नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. या कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. परंतु यासाठी कामगारांच्या कामाचे दिवसाला १२ तास असतील. त्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती आवश्यक असेल. केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले, की कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे. कंपनी-कामगारांची सहमती हवीनव्या कायद्यांनुसार कंपन्यांना कामाच्या दिवसांबाबत लवचिकता मिळेल. आठवड्यात एकूण ४८ तास काम करावे लागते. त्यानुसार दररोज १२ तास काम केल्यास आठवड्यात ४ दिवस कामाचे असून शकतात. मात्र, त्यासाठी कंपनी आणि कामगार यांच्यात सहमती हवी. नवा नियम कोणावर लादता येणार नाही.असंघटित क्षेत्रासाठी स्वतंत्र संकेतस्थळश्रम मंत्रालयातर्फे स्वतंत्र इंटरनेट संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. असंघटित क्षेत्रासाठी हे संकेतस्थळ असून यावर्षी जून महिन्यापर्यंत कामगार त्यावर नोंदणी करु शकतील. नोंदणी करणऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या संकेतस्थळाचा उल्लेख केला हाेता.सक्ती करता येणार नाहीनव्या कायद्यानुसार ४ दिवस काम करून ३ दिवसांची सुट्टी घेता येईल. असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी निर्णय घेऊ शकतात. बहुतांश राज्यांनी त्यांची नियमावली तयार केली आहे. अंतिम मसुदा लवकरच तयार होईल, असे चंद्रा म्हणाले. याबाबतच्या शंका चर्चेतून साडविण्यात आल्या आहेत, असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.१ एप्रिलपासून नवे कायदेनवे कायदे १ एप्रिलपासून लागू करण्याची सरकारची याेजना आहे. त्यात वेतन कायदा, औद्याेगिक निगडित कायदा, सुरक्षा, आराेग्य व सामाजिक सुरक्षा कायद्यांचा समावेश आहे. नव्या कायद्यांमध्ये कामगार राज्य विमा महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचीही तरतूद केली आहे. कंपन्यांवर त्याचा भार पडणार नाही. सर्व घटकांचा विचार करुनच अंतिम वर्कर्स काेड लागू करण्यात येतील, असे चंद्र यांनी सांगितले.