शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 04:28 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पत्रावरून संतप्त : शेतकऱ्यांची बदनामी नको

चंडीगढ : पंजाबमधून नुकत्याच मुक्त केलेल्या ५८ मजुरांच्या स्थितीबाबत केंद्र सरकारने राज्याला लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांबद्दल दुष्प्रचार केल्यावरून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.त्यांनी म्हटले आहे की, कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा हा एक कट आहे. या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व भाजप सातत्याने अतिरेकी, शहरी नक्षली व गुंडे म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.अमरिंदर सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांवर मजुरांसंबंधीचा आरोप करणे अयोग्य आहे. याबाबत केंद्राचा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे.या संपूर्ण घटनाक्रमाचे विश्लेषण केले असता एक बाब प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे भारत-पाक सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने पकडलेल्या संशयित व्यक्तींच्या अटकेबाबतची संवेदनशील माहिती शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी निराधार तथ्यांच्या आधारे समोर आणली जात आहे. याबाबत राज्य सरकारकडून उपयुक्त उत्तर येण्याची वाट न पाहता, गृहमंत्रालयाने काही प्रमुख माध्यमांना निवडक पद्धतीने दिली.माझे सरकार व पोलीस गरिबांच्या, वंचितांच्या मानवाधिकारांच्या रक्षणासाठी सक्षम आहे. प्रत्येक प्रकरणावर योग्य ती कारवाई सुरू आहे. बहुतांश लोक त्यांच्या कुटुंबांसमवेत राहत आहेत. या प्रकरणात कोणत्याही टप्प्यावर काहीही तथ्य गुन्हेगारांच्या विरोधात समोर आले तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.केंद्राच्या पत्रात नेमके काय म्हटले?पंजाब राज्याच्या मुख्य सचिवांना १७ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ५८ जणांना चांगले वेतन देण्याचा वायदा करून पंजाब राज्यामध्ये आणण्यात आले होते. परंतु त्यांचे शोषण करण्यात आले. त्यांना पंजाब राज्यात आल्यावर अमलीपदार्थ देण्यात आले व अमानवीय दशेमध्ये काम करण्यास बाध्य करण्यात आले. या पत्रावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संघर्ष उडाला आहे.या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व भाजप सातत्याने अतिरेकी, शहरी नक्षली व गुंडे म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.