शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना आता 4 लाख मिळणार नाहीत, केंद्र सरकारने मागे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 20:56 IST

Coronavirus : संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देचीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहेसंपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. याआधी केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सरकारचे सहसचिव संजीव कुमार जिंदल यांनी अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली. 

संजीव कुमार जिंदल यांनी सांगितले की, "आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी होणारा खर्च देण्यात येईल. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीचे विलगीकरण आणि तपास तसेच उपचारांवरील खर्च सरकार करेल. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून करण्यात येईल."

दरम्यान, संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या  संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना