शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘अग्निपथ’वर चर्चा करण्यास केंद्राचा नकार; वेणुगोपाल, रेड्डी, दानिश अली यांचा अध्यक्षांशी वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 12:00 IST

अग्निपथ योजनेवर चर्चा करण्यास नकार दिल्याने संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीतून विरोधी सदस्य बाहेर पडले.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवर चर्चा करण्यास नकार दिल्याने संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीतून विरोधी सदस्य शुक्रवारी बाहेर पडले. काँग्रेस व बसपा सदस्यांनी समितीचे अध्यक्ष ज्यूएल ओराम यांना अग्निपथ योजनेवर चर्चा करण्याची विनंती केली. यात खूप मोठी गुंतागुंत आहे व हा मुद्दा संसदीय समितीने चर्चेला घ्यावा, असे विरोधक म्हणाले; परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल व उत्तम कुमार रेड्डी तसेच बसपाचे दानिश अली या सदस्यांचा यावेळी अध्यक्षांशी अर्धा तास वाद झाला. अग्निपथ योजनेवर संरक्षणविषयक सल्लागार समिती तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची चर्चा झाली आहे.  तिन्ही दलांच्या प्रमुखांनी याबाबत सादरीकरणही केलेले आहे. अग्निपथ योजनेवर चर्चा न करू देणे हा संसदेचा अवमान आहे, तसेच समितीला याबाबत माहिती न देणे हा हक्कभंग आहे, असेही विरोधक म्हणाले. हा विषय पुढील बैठकीत चर्चेसाठी निश्चित करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली; परंतु अध्यक्षांनी परवानगी नाकारली. 

या मुद्द्यांचा अजेंडा समितीच्या बैठकांमध्ये या वर्षीच्या प्रारंभी चर्चेला आलेला होता. त्यामुळे आता पुन्हा याबाबतची विनंती स्वीकारली जाऊ शकत नाही, असे अध्यक्ष म्हणाले.सदस्य हा मुद्दा संसदेत उपस्थित करू शकतात व चर्चा करू शकतात; परंतु येथे चर्चा करता येणार नाही, असेही अध्यक्षांनी सांगितले.  ही योजना म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे सशस्त्र दलातील सर्वांत मोठे बदल आहेत. यावर संसदीय समितीने चर्चा करणे आवश्यक आहे. सरकारच्या कृतीची समीक्षा केली पाहिजे, असे विरोधक म्हणाले.

योजनेबाबत समितीला अंधारात का ठेवले? 

- के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीच्या  बैठकीतून उत्तमकुमार, दानिश अली आणि मी बाहेर पडलो. आम्ही अनेकदा विनंती करूनही वादग्रस्त अग्निपथ योजनेचा मुद्दा चर्चेला घेतला नाही. 

- अग्निपथ योजनेबाबत समितीला अंधारात का ठेवण्यात आले? बजेटविषयक बैठकीत हा मुद्दा चर्चेला का घेण्यात आला नाही? याबाबत संसदेत चर्चा करण्यात आली नाही. संसदीय स्थायी समितीत हा विषय घेतला नाही. अशा प्रकारे विधेयके लादण्याचे काम करण्यात येत आहे. 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनAgneepath Schemeअग्निपथ योजना