शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

केंद्र सरकारने 14 मेसेंजर अ‍ॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी पाकमधून मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 11:23 IST

दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अ‍ॅप्सचा वापर पाकिस्तानकडून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी केला होता. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारनेपाकिस्तानी अ‍ॅप्सविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने गुप्तचर संस्थेच्या (आयबी) इनपुटवरून पाकिस्तानमधून ऑपरेट केलेल्या 14 मेसेंजर अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अ‍ॅप्सचा वापर पाकिस्तानमधून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी करत होते. 

दरम्यान, गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचे 14 मोबाइल मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन ब्लॉक केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर दहशतवाद्यांनी काश्मीरमधील त्यांचे समर्थक आणि ऑन ग्राउंड वर्कर्ससोबत संवाद साधण्यासाठी केला होता. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर संस्था ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या चॅनेलवर लक्ष ठेवतात. संभाषणाचा मागोवा घेत असताना गुप्तचर संस्थांना असे आढळले की, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे भारतात प्रतिनिधी नाहीत आणि त्यावरील घडामोडींचा मागोवा घेणे कठीण आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्नअधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यानंतर खोऱ्यात कार्यरत असलेल्या इतर गुप्तचर संस्थांच्या मदतीने अशा अ‍ॅप्सची यादी तयार करण्यात आली, जे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात आणि भारतीय कायद्यांचे पालन करत नाहीत. यादी तयार झाल्यानंतर या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची विनंती संबंधित मंत्रालयाला करण्यात आली.तसेच, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

या अ‍ॅप्सवर बंदीसूत्रांनी सांगितले की, या अ‍ॅप्समध्ये  क्रायपव्हायझर, एनिग्मा, सेफस्विस, विकरमे, मीडियाफायर, ब्रायर, बीचॅट, नंदबॉक्स, कॉनिअन, आयएमओ, एलिमेंट, सेकेंड लाइन, जांगी, थ्रेमा इत्यादींचा समावेश आहे.

टॅग्स :MobileमोबाइलCentral Governmentकेंद्र सरकारPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी