शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी केंद्रीय पथक कोटामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:23 IST

रुग्णालयाची करणार पाहणी; आणखी सुविधा देणार, आतापर्यंत १0३ अर्भकांचा मृत्यू

कोटा : राजस्थानातील कोटा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जे. के. लोन रुग्णालयात अर्भकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी निष्णात बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेले एक वैद्यकीय पथक केंद्र सरकारने तिथे गुरुवारी पाठविले आहे. या रुग्णालयात १ डिसेंबरपासून आतापर्यंत १०३ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, जे. के. लोन शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय उपचारांच्या सोयी, त्यात असलेल्या उणिवा, मनुष्यबळाचा, तसेच वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता अशा अनेक गोष्टींबाबत केंद्राने पाठविलेले वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक रुग्णालयाची पाहणी करेल. तसेच राजस्थान सरकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहे. त्यातून या रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा, तसेच आर्थिक साहाय्य देण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल. या रुग्णालयाला शक्य ती सर्व मदत केंद्रातर्फे केली जाईल, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दूरध्वनीवरील चर्चेत हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.केंद्र सरकारने कोटाला पाठविलेल्या वैद्यकीय पथकामध्ये एम्स जोधपूर येथील बालरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. कुलदीप सिंह, डॉ. दीपक सक्सेना, एम्स जोधपूरमधील डॉक्टर अरुण सिंह, राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राचे सल्लागार डॉ. हिमांशू भूषण यांचा समावेश आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारीला जे. के. लोन रुग्णालयात तीन अर्भकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णालयात महिनाभरात शंभराहून अधिक अर्भके मरण पावल्याने खळबळ माजली होती. हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना गुरुवारी दिला होता. (वृत्तसंस्था)अनेक उपकरणे कालबाह्यकोटा येथील जे. के. लोन रुग्णालयात ५३३ महत्त्वाची उपकरणे असणे आवश्यक आहे. मात्र, तिथे फक्त त्यातील २१३ उपकरणेच आहेत.तीच स्थिती इन्फ्युजन पंप, बीपी मोजण्याचे उपकरण, एक्स-रे यंत्रांची आहे. या रुग्णालयात असलेल्या खाटांपेक्षा तिथे येणाºया रुग्णांची संख्या खूपच जास्त आहे. अशा अनेक समस्यांमुळे तिथे नीट उपचार होत नाही, अशी टीका होते.20 पैकी 14 व्हेंटिलेटर,38 पैकी 32 पल्स आॅक्सिमीटर,28 पैकी 22 नेब्युलायझर कालबाह्य झाली आहेत.