शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

या भाष्यकाराची उणीव नेहमीच जाणवेल; गिरीश कर्नाड यांना गडकरींची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 23:09 IST

प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी कर्नाड यांचं निधन

मुंबई: समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव नेहमीच जाणवेल, अशा शब्दांत केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली. कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. अभिनय आणि साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आदरांजली वाहिली. 'ज्येष्ठ अभिनेते, लेखक, नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांच्या निधनानं भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीतील एक भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच कर्नाड यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. ते प्रख्यात विचारवंत आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांची ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातील भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. ‘मेरी जंग’ या हिंदी सिनेमात त्यांची भूमिका अतिशय छोटी होती. परंतु सत्याशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहणारा आणि त्यासाठी निश्चलपणे फासावर चढणारा ‘दीपक वर्मा’ हा माणूस कर्नाड यांनी आपल्या संयत अभिनयाने अमर केला. आजारी असताना शेवटच्या काळात ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील कर्नाड यांची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या या प्रतिभावंताची उणीव नेहमीच जाणवणार आहे', अशा शब्दांत गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पित केली.  

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडNitin Gadkariनितीन गडकरी