शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Booster Dose: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 07:45 IST

covid booster dose for Health workers: मेडिकल जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी एका संयुक्त अभ्यासात म्हटले होते की, कोरोना लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटमुळे संक्रमित होत आहेत.

देशात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी तयारी सुरु केली असून फ्रंट वर्कर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनो लसीचा बुस्टर डोस (Booster Dose) देण्यावर विचार सुरु करण्यात आला आहे. केंद्र सरकार लवकरच यावर अंतिम निर्णय घेणार आहे. (Health workers may get corona vaccine booster dose soon.)

मेडिकल जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी एका संयुक्त अभ्यासात म्हटले होते की, कोरोना लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटमुळे संक्रमित होत आहेत. अधिकतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झाल्यावर गंभीर लक्षणे दिसली नाहीत. मात्र, त्यांना आयसोलेशनमध्ये जावे लागले आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या दिल्लीतील आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, या परिस्थितीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमधील ही संभाव्य कमतरता रोखण्यासाठी लवकरात लवकर बुस्टर डोस देणे गरजेचे आहे. 

दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार बुस्टर डोसवर संशोधन कमी असल्यामुळे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची एक टीम काम करत आहे. लसीकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या एका सदस्याने सांगितले की, कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोसची चर्चा सुरु आहे. संशोधनानंतर देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुसऱ्या डोसला सहा महिने झाल्यावर बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

७० कोटी लसीकरणदेशात आतापर्यंत कोरोनाच्या लसींचे ७० कोटी डोस दिले गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी ट्विट करून याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 10 कोटी डोस केवळ 13 दिवसांच दिले गेले आहेत. तर पहिले 10 कोटी डोस देण्यासाठी 85 दिवस लागले होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या