शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘सीएए’साठी केंद्राने सुरू केले पोर्टल; स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 05:23 IST

अनेकांनी केले समर्थन, देशभरात संमिश्र प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांचा निकाल जोवर लागत नाही तोवर नागरिकत्व दुरुस्ती नियम २०२४च्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तर, या कायद्यानुसार पात्र असलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा अर्ज करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पोर्टल सुरू केले आहे.

इंडियन युनियन मुस्लिम लीग या संघटनेने या याचिकेद्वारे मुस्लिमांनाही भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. तर, डीवाएफवायने ‘सीएए’च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सीएएद्वारे पात्र व्यक्तींनी भारतीय नागरिकत्वाकरिता अर्ज करण्यासाठी indiancitizenshiponline.nic.in हे पोर्टल मंगळवारपासून सुरू केले आहे. तसेच CAA-2019 या मोबाइल ॲपद्वारेदेखील इच्छुक व्यक्ती आपला अर्ज दाखल करू शकतात. 

काेणती कागदपत्रे हवी?  

- आपण कोणत्या देशाचे रहिवासी आहोत हे सिद्ध करण्यासाठी नऊ प्रकारची कागदपत्रे सादर करता येतील. त्यामध्ये वैध किंवा मुदत संपलेला पासपोर्ट असणार आहे. त्याशिवाय काही ओळखपत्रे, जमिनीची मालकी असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. अर्जदार हा अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे त्या कागदपत्रांतून स्पष्ट होऊ शकते..

- पोर्टलवर व्हिसाची प्रत, भारतात दाखल झाल्याचा इमिग्रेशन स्टॅम्प, सदर व्यक्तीने भारतात ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी प्रवेश केला आहे, असे नमूद करणारे ग्रामीण, शहरी भागातील कोणत्याही लोकप्रतिनिधीचे किंवा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जदाराने सादर करायचे आहे. यासाठी २० कागदपत्रांपैकी कोणतीही उपलब्ध कागदपत्रे द्यायची आहेत. 

असा करा अर्ज

- इंडियन सिटीझनशिप ऑनलाईनच्या वेबसाईटवर साईनअप करुन नाेंदणी करावी.- भारतीय नागरिकत्त्व प्राप्त करण्यासाठी अर्ज जमा करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.- माेबाईल क्रमांक किंवा इ-मेल आयडी द्या- नाव, इ-मेल आयटी सबमिट केल्यानंतर माेबाईल व इ-मेलवर ओटीपी प्राप्त हाेईल.- ओटीपीद्वारे पडताळणी करा. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू हाेईल.- अर्जात काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. - सर्व माहिती भरल्यांतर ॲक्सेप्ट व सबमिट यावर क्लिक करा.- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलाेड करावी लाागतील. - ऑनलाईन प्रक्रीयेसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल.

‘आता आमचे भविष्य सुरक्षित’

सीएएची अंमलबजावणी झाल्याने आता आमचे भारतात भविष्य सुरक्षित आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व दिल्ली येथे राहात असलेल्या हिंदूंनी दिली. तर, ‘सीएए’वरुन देशभरात कुठे विराेध तर कुठे पाठिंबा दिसून आला.

देशभरात संमिश्र प्रतिक्रिया

कोणाही भारतीयाचे नागरिकत्व सीएए कायद्यामुळे रद्दबातल होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू, बौद्ध, शीख, जैन स्थलांतरितांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मानच केला आहे. सीएएप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हे खोटे आरोप करत आहेत, अशी टीका शाह यांनी केली.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक