शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

'केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 10:31 IST

Sonia Gandhi : सरकारने 'सेंट्रल व्हिस्टा' ही संसदेची नवी इमारत बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा अनावश्यक खर्च होणारा निधी कोरोना लढाईकडे वळवावा, अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी केली आहे.

ठळक मुद्देलसींच्या किमती वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत. यावरून राजकारण तापले आहे.

नवी दिल्ली : येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. यादरम्यान लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. या लसींच्या किमती वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत. यावरून राजकारण तापले आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या लस धोरणावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. यामध्ये लसींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, असे म्हटले होते. दरम्यान, आता केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. (Central government's vaccination policy is discriminatory and insensitive, criticizes Sonia Gandhi)

सोनिया गांधी यांनी 'दी इंडियन एक्स्प्रेस'ला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी कोरोना संकट, त्याची हाताळणी याविषयी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी कोरोना संकटाविरोधातील लढाई 'आम्ही विरुद्ध तुम्ही' अशी नाही, तर ती 'आपण सर्व विरुद्ध कोरोना’ अशी आहे. ही लढाई देशाने एकजुटीने लढणे आवश्यक आहे, त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचे आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, कोरोना साथीचा सामना सर्वांच्या मदतीनेच केला पाहिजे, दुर्दैवाने मोदी सरकारने मतैक्याऐवजी धाकदपटशाची भूमिका घेतली आहे. लढा काँग्रेसविरोधात किंवा राजकीय विरोधकांशी नाही, हे वास्तव नरेंद्र मोदी यांनी  ध्यानात घ्यावे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

("तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...)

याचबरोबर, काँग्रेसच्या सूचनांना त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, उलट ज्या राज्यांत भाजपा सरकार नाही तेथे कोरोना साथ हाताळताना चुका होत असल्याचे ते सांगत राहिले. भारत हा जगातील सर्वांत मोठा ऑक्सिजन उत्पादक देश असताना टंचाई कशी निर्माण झाली, हे सरकारने सांगणे अपेक्षित आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच, सरकारने 'सेंट्रल व्हिस्टा' ही संसदेची नवी इमारत बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा अनावश्यक खर्च होणारा निधी कोरोना लढाईकडे वळवावा, अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी केली आहे.

(Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण)

सोनिया गांधी यांच्या सूचना...-  औषधांचा काळाबाजार, नफेखोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी.-  पुरेशा रुग्णालय पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात.-  विशेष गाड्यांनी स्थलांतरित मजुरांना सुरक्षित प्रवास करू द्यावा.-  ‘मनरेगा’ची कामे वाढवावीत म्हणजे गावी गेलेल्या नागरिकांना रोजीरोटी मिळेल.-  प्रत्येक कुटुंबाला सहा हजार रुपये मदत विनाविलंब द्यावी.-  सरकार अपारदर्शक, आक्रमक, संवेदनाहीन असून चालत नाही. त्याचबरोबर प्रशासनाचा दृष्टिकोन पारदर्शक, उत्तरदायित्व स्वीकारणारा, सोयीसुविधांना प्राधान्य देणारा, नागरिकांना पाठबळ देणारा असला पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार