शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ साठीची केंद्र सरकारची सुट्ट्यांची यादी जाहीर, शनिवार, रविवारमुळे बुडणार १२ सुट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 06:46 IST

Government's holiday: नवे वर्ष सुरू व्हायला जेमतेम ३५ दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षात किती सुट्ट्या मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. २०२२ मध्ये एकूण ४२ सरकारी सुट्ट्या राहणार आहेत. 

नवी दिल्ली : नवे वर्ष सुरू व्हायला जेमतेम ३५ दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षात किती सुट्ट्या मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. २०२२ मध्ये एकूण ४२ सरकारी सुट्ट्या राहणार आहेत. अनेक जण सुट्ट्या पाहून फिरण्याचे किंवा इतर कार्यक्रमांचे नियाेजन आखतात. त्यामुळे पुढील वर्षातील सुट्टीचे कॅलेंडर पाहूनच नियाेजन करू शकतात. नव्या वर्षात ४२ पैकी १८ गॅझेटेड सुट्ट्या राहणार आहेत. उर्वरित रिस्ट्रिक्टेड सुट्ट्या राहतील. या अशा सुट्ट्या असतात ज्यांचा निर्णय संस्था किंवा कंपनी घेते. शनिवार आणि रविवारमुळे नव्या वर्षात अनेक सुट्ट्या बुडणार आहेत. २०२२ च्या कॅलेंडरवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल. काही सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असतात. राज्यांकडूनही सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी केले जाते. त्यातून संबंधित राज्यांमधील सुट्ट्यांची माहिती मिळते. डिसेंबरमध्ये राज्यांकडून हे कॅलेंडर जारी हाेण्याची शक्यता आहे. 

या सुट्ट्या आहेत शनिवार आणि रविवारीअनेक ठिकाणी वसंत पंचमी आणि दयानंद सरस्वती जयंतीची सुट्टी देण्यात येते. दाेन्ही दिवस शनिवारी आले आहेत. वसंत पंचमी ५ फेब्रुवारी आणि दयानंद सरस्वती जयंती २६ फेब्रुवारीला आहे. त्यामुळे या सट्ट्या बुडाल्या आहेत. तर पारसी नववर्ष २० मार्चला रविवारी आहे. तर गुढीपाडवा २ एप्रिलला रविवारी आहे. इस्टर संडे १७ एप्रिलला आहे. १ मे राेजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनही रविवारीच येत आहे. १० जुलैला बकरी ईद रविवारीच आहे. याशिवाय ऑक्टाेबरमध्ये २ तारखेला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, ९ ऑक्टाेबरला महर्षी वाल्मीकी जयंती आणि ३० ऑक्टाेबरला छटपूजा हे शनिवारी येत आहेत. तर ८ ऑक्टाेबरला रविवारी मिलाद उद-नबी आहे. ख्रिसमसची २५ डिसेंबरची सुट्टीही रविवार असल्याने बुडाली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार