शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

केंद्र सरकार मुंबई, दिल्लीसह ४ विमानतळांतील ‘एएआय’ची हिस्सेदारी विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 07:26 IST

माहितगार सूत्रांनी सांगितले की, नागरी उड्डयन मंत्रालयाला मालमत्ता रोखीकरणातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मालमत्ता रोखीकरणावर काम करणाऱ्या सचिवांच्या गाभा समूहाची एक बैठक ८ फेब्रुवारी राेजी झाली होती.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे कमी झालेल्या महसुलाची भरपाई करण्यासाठी मालमत्ता रोखीकरणावर भिस्त असलेल्या केंद्र सरकारकडून आता दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथील विमानतळांतील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) उर्वरित हिस्सेदारी विकण्यात येणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. (The central government will sell AAI's stake in four airports, including Mumbai and Delhi)

माहितगार सूत्रांनी सांगितले की, नागरी उड्डयन मंत्रालयाला मालमत्ता रोखीकरणातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मालमत्ता रोखीकरणावर काम करणाऱ्या सचिवांच्या गाभा समूहाची एक बैठक ८ फेब्रुवारी राेजी झाली होती. या बैठकीत रोखीकरणासाठी १३ विमानतळांची यादी सादर करण्यात आली होती.  सूत्रांनी सांगितले की, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळातील एएआयची हिस्सेदारी विकण्यासाठी आवश्यक मंजुऱ्या उड्डयन मंत्रालयाकडून घेण्यात येतील. 

मंजुरी मिळाल्यानंतर विक्रीची प्रक्रिया सुरू केली जाईल. दिल्ली आणि मुंबई विमानतळात एएआयची प्रत्येकी २६ टक्के हिस्सेदारी आहे. हैदराबाद आणि बंगळुरू विमानतळात प्रत्येकी १३ टक्के हिस्सेदारी आहे. दिल्ली विमानतळात जीएमआर समूहाची ५४ टक्के हिस्सेदारी आहे. मुंबई विमानतळात अदानी समूहाची ७४ टक्के हिस्सेदारी आहे. 

गेल्या वर्षात सहा विमानतळांचे खासगीकरणगेल्या वर्षी केंद्र सरकारने सहा विमानतळांचे खाजगीकरण केले होते. अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम हे ते विमानतळं आहेत. याशिवाय आणखी सहा विमानतळांचे परिचालन, व्यवस्थापन आणि विकास यांसाठी सरकारी व खाजगी भागीदारीचे प्रतिमान स्वीकारण्यास एएआय बोर्डाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAirportविमानतळairplaneविमान