शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 07:52 IST

राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील जनतेने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तिसऱ्यांदा स्पष्ट आणि स्थिर जनादेश दिला आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले. 

आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये नवीन खासदारांचे अभिनंदन करीत मुर्मू यांनी ते भारतातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माध्यम म्हणून काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. युद्धांदरम्यान वर्चस्वासाठी सशस्त्र दलांत सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.

आणीबाणी हा सर्वांत मोठा काळा अध्याय- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणीबाणी राज्यघटनेवर थेट हल्ल्याचा सर्वांत मोठा आणि काळा अध्याय आहे. अशा असंवैधानिक शक्तींवर देशाने विजय मिळवला,असे नमूद केले. - राष्ट्रपतींनी भाषणात आणीबाणीचा उल्लेख केल्यावर काही विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, त्याकडे राष्ट्रपतींनी दुर्लक्ष केले. 

२५,००० जन औषधी केंद्रे देशभरात सुरू- आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार. देशात २५००० जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. - आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ५५ कोटी लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूSenior Citizenज्येष्ठ नागरिक