शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार उघडणार काश्मीर खोऱ्यातील बंद असलेल्या 50 हजार मंदिरांचे दरवाजे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 15:34 IST

जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये अजून एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

बंगळुरू - जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये अजून एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेली सुमारे 50 हजार मंदिरे पुन्हा उघडण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.  काश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.  जी. किशन रेड्डी काश्मीर खोऱ्यातील बंद मंदिरांबाबत म्हणाले की, ''आम्ही काश्मीर खोऱ्यात बंद पडलेल्या शाळांचा सर्वे करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे, या शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोऱ्यातील सुमारे 50 हजार मंदिरे बंद अवस्थेत आहेत.  ज्यातील काही मंदिरे नष्ट झाली आहेत, तेथील मूर्ती भग्नावस्थेत आहेत, अशा मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.'' 90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नंगानाच सुरू झाला होता. त्यानंतर लाखो काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून परागंदा व्हावे लागले होते. या काळात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या केल्या होत्या. तसेच अनेक मंदिरांचीही मोडतोड केली होती. काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर अनेक मंदिरे बंद पडली होती. त्यामध्ये काही प्रसिद्ध मंदिरांचाही समावेश आहे.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTempleमंदिरCentral Governmentकेंद्र सरकार