शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:16 IST

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार होते. पण, प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. आता हे विधेयक उद्या म्हणजेच मंगळवारी मांडले जाणार आहे. सोमवारी विधेयक मांडण्यासाठी सर्व तयारीही झाली होती. विधेयकाची प्रत रविवारीच सर्व खासदारांना पाठवण्यात आली होती. मात्र सोमवारी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. 

या विधेयकाला आम आदमी पक्षाकडून सुरुवातीपासून विरोध हो आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभर फिरून हे विधेयक रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला. त्यांना काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे. 

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये वादया विधेयकावरुन केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (GNCTD) कायदा, 1991 दिल्लीतील विधानसभा आणि सरकारच्या कामकाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी लागू आहे. 2021 मध्ये केंद्र सरकारने त्यात सुधारणा केली होती. या दुरुस्तीअंतर्गत दिल्लीतील सरकारच्या कामकाजाबाबत काही बदल करण्यात आले. यामध्ये उपराज्यपालांना काही अतिरिक्त अधिकार देण्यात आले. त्यानुसार निवडून आलेल्या सरकारला कोणत्याही निर्णयासाठी एलजीचे मत घेणे बंधनकारक करण्यात आले. 

यावर केजरीवाल सरकारने आक्षेप घेतला. याला आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की, राजधानीतील जमीन आणि पोलिस यासारख्या काही बाबी वगळता इतर सर्व बाबींमध्ये दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारचे वर्चस्व असावे. केजरीवालांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात मोठा निकाल दिला. यानुसार, अधिकार्‍यांच्या नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्ली सरकारकडे आले. 

यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी केंद्र सरकारने 19 मे रोजी अध्यादेश काढला. यामध्ये राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण (NCCSA) स्थापन करण्यास सांगितले. त्यात गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारी या प्राधिकरणाकडे देण्यात आली. म्हणजेच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे गेले. आता हे विधेयक कायद्यात बदलण्यासाठी संसदेत मांडले जात आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकारAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा