शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालणं योग्य नाही"; सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:08 IST

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या राजकारण्यांवर आजीवन बंदी घालणे कठोर असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं.

Supreme Court: दोषी असलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्याच्या मागणीवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलं आहे. दोषी आमदार किंवा खासदारांवर घातलेली बंदी पुरेशी नसल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना दोषी ठरलेले राजकारणी संसदेत परत येऊन कायदे कसे बनवू शकतात? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता. त्यावर बाजू मांडताना केंद्र सरकारने सहा वर्षे शिक्षा पुरेशी असल्याचे म्हटलं आहे.

गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेल्या नेत्यांना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालणे योग्य नसल्याचे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले. सध्याची सहा वर्षांची बंदी पुरेशी असल्याचे केंद्राने म्हटलं. फौजदारी खटल्यांमध्ये दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकाला विरोध करताना केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली. या याचिकेत दोषी खासदार-आमदार आणि इतर नेत्यांवर निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सरकारला या मागणीवर उत्तर देण्यास सांगितले होते.

वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी २०१६ मध्ये दोषी आमदार किंवा खासदारांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. २०१६ पासून प्रलंबित असलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम आठला आव्हान देण्यात आले होते. यानुसार दोषी राजकारण्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर फक्त सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मर्यादा आहे.

सुप्रीम कोर्टा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटलं की, "याचिकेत केलेली विनंती म्हणजे कायद्याचे पुनर्लेखन करणे किंवा संसदेला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देणे आहे. जे सुप्रीम कोर्टाच्या न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारांच्या पलीकडे आहे. अशाप्रकारे अपात्रतेचा निर्णय घेणे केवळ संसदेच्या अधिकारक्षेत्रात येते. आजीवन बंदी घालणे योग्य आहे का हा प्रश्न पूर्णपणे संसदेच्या अधिकारक्षेत्रात आहे. दंडाची अंमलबजावणी योग्य वेळेपर्यंत मर्यादित करून अनावश्यक कठोर कारवाई टाळली गेली पाहिजे."

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसद