शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:08 IST

भारताची सीमा २२,६२३ किलोमीटर लांब आहे. यात बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान या देशांसोबतची १५,१०६ किमी जमिनीवरील सीमा आहे.

नवी दिल्ली : सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि तस्करी थांबविण्यासाठी केंद्र सरकार भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना लिहिलेल्या पत्रानुसार, दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर भारतातही सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. 

दक्षिण आफ्रिकेत बॉर्डरच्या व्यवस्थापनासाठी साउथ आफ्रिकन बॉर्डर मॅनेजमेंट अथॉरिटी बनविण्यात आली आहे. याबाबत डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले होते. शाह यांनी ही मागणी मान्य केली आहे.

भारताची सीमा २२,६२३ किलोमीटर लांब आहे. यात बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान या देशांसोबतची १५,१०६ किमी जमिनीवरील सीमा आणि ७,५१६ किमी समुद्रीसीमेचा समावेश आहे. वेगवेगळ्या सीमांची सुरक्षा वेगवेगळ्या दलांमार्फत केली जाते. 

गृह मंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन विभागाने सीमेच्या रक्षणासाठी कुंपण, फ्लडलाइटिंग, रस्ते, सीमा चौकी, तंत्रज्ञान या उपाययोजना केल्या आहेत. 

यानंतरही, बेकायदेशीर स्थलांतर, ड्रग्ज व मानव तस्करी आणि घुसखोरी असे प्रकार घडतात. हे थांबविण्यासाठी सीमेचे रक्षण करणाऱ्या दलांचे एक प्राधिकरण बनविणे आवश्यक असल्याचे डॉ. गोपछडे यांनी लक्षात आणून दिले होते.

देशाला लागून सीमा व सुरक्षेची जबाबदारी

बांगलादेश, पाकिस्तान - सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)

चीन इंडो - तिबेटीयन बॉर्डर पोलिस

नेपाळ, भूतान - सशस्त्र सीमा बल

म्यानमार - आसाम रायफल्स

भारत-पाकिस्तान एलओसी - लष्कर

भारत-चीन एलएसी - लष्कर

सागरी सीमा - नौदल, तटरक्षक दल आणि राज्य (सागरी) पोलिस

टॅग्स :Borderसीमारेषाborder disputeसीमा वादPakistanपाकिस्तानchinaचीनHome Ministryगृह मंत्रालय