शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 06:21 IST

Modi Government news: नियुक्ती पद्धतीचे मूल्यांकन करणे, अनावश्यकता कमी करून प्रशासनाच्या गरजांशी कर्मचारी क्षमतांचे मूल्यांकन करणे यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे.

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत मोदी सरकार कर्मचारी नियुक्तीची फेररचना करीत आहे. गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, आरोग्य, कृषी व  जैवतंत्रज्ञान यासह सहा प्रमुख मंत्रालये मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्यासाठी आढावा घेत आहेत. 

नियुक्ती पद्धतीचे मूल्यांकन करणे, अनावश्यकता कमी करून प्रशासनाच्या गरजांशी कर्मचारी क्षमतांचे मूल्यांकन करणे यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे. याचे ध्येय केवळ संख्या कमी करणे नव्हे तर अकार्यक्षमता दूर करून कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना करणे व प्रशासकीय कामाचा वेग वाढवणे, हे आहे. 

समितीच्या अहवालात सहा मंत्रालयातील कौशल्य बळकट करताना मंजूर पदांमध्ये गणनात्मक कपात सुचविण्यात आली आहे. याबरोबरच कौशल्य अनुकूलता आणि धोरणात्मक कार्यबल नियोजनाद्वारे भविष्यातील आव्हानांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तयार करण्याची गरज, यावर भर देण्यात आला आहे. 

प्रत्येक चौथे सरकारी पद रिक्त

अनुकूल सरकार कर्मचारी भरती करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही मंजूर पदांपैकी जवळपास एक चतुर्थांश पदे रिक्त आहेत. 

अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या अहवालानुसार, २०२३ पर्यंत ४०.३९ लाख मंजूर पदांपैकी २४.२१ टक्के जागा रिक्त होत्या. 

ब (एनजी) श्रेणीमध्ये रिक्त पदांचा दर सर्वाधिक ३३.४२ टक्के होता. त्यानंतर क श्रेणी (२३.७७ टक्के) आणि अ गट (२२.५४ टक्के) यांचा नंबर लागतो. 

टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी 

याचे नेतृत्व कॅबिनेट सचिवालय, कार्मिक व प्रशिक्षण विभाग आणि क्षमता निर्माण आयोग करीत आहे. 

समितीच्या अहवालात सहा मंत्रालयातील कौशल्य बळकट करताना मंजूर पदांमध्ये गणनात्मक कपात सुचविली आहे. 

भविष्यातील आव्हानांसाठी कर्मचाऱ्यांना तयार करण्यावर अहवालात भर देण्यात आला आहे. ही  पुनर्रचना टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जाईल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी