शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तुटीची चिंता न करता केंद्र सरकारने खर्च वाढवावा; माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 05:46 IST

अर्थव्यवस्था ठप्प होऊ न देण्याचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वित्तीय तुटीची चिंता न करता केंद्र सरकारने खर्च करावा. त्यासाठी गरज भासल्यास कर्ज घ्यावे किंवा चलनी नाेटांची छपाई वाढवावी. मात्र, अर्थव्यवस्था ठप्प पडायला नकाे, असा सल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्राला दिला आहे.एका ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्यात आला हाेता. मात्र, आता जून महिना उजाडला असून अर्थसंकल्पीय तरतुदी अद्याप अंमलात आलेल्या नाही. पहिली लाट ओसरत असल्याचे दिसल्यानंतर सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा हाेत असल्याचे खाेटे स्वप्न रंगविल्याची टीका चिदंबरम यांनी केली. ते म्हणाले, सरकारने आता खर्च न केल्यास राज्यांवरील आर्थिक संकट वाढेल. राज्यांना जीएसटीमधील हिस्सा लवकरात लवकर दिला पाहिजे. तसे न झाल्यास लसीकरणावरही परिणाम हाेऊ शकताे. वित्तीय तूट ६.५ टक्क्यांपर्यंत वाढली तरी त्याबाबत आता चिंता करण्याची गरज नाही. सरकारने जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात थेट राेख ट्रान्सफर करण्यावर भर दिला पाहिजे, असे चिदंबरम यांनी सांगितले.  सरकारला अर्थव्यवस्था सुरळीत चालू ठेवण्याची गरज असून, त्यासाठी भेदभाव न करता राज्यांना निधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.देशात दाेन वर्षांमध्ये बहुतांश नागरिक गरीब झाले आहेत. जीडीपीमध्ये प्रत्यक्षात ८.२ टक्क्यांची घट झाली आहे. हा गेल्या तीन वर्षांपूर्वीपेक्षाही कमी असल्याचे चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरम