शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 5:11 AM

शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही.

बागपत : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत असलेल्या शेतकऱ्यांची बाजू मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी घेतली असून, आंदोलकांचे मन दुखवू नका, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाकेले. मलिक रविवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की,‘शेतकऱ्यांना केंद्र सरकारने किमान आधारभूत भावाची हमी दिली तर शेतकरी विरोध कमी करतील.’ आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांना अटक होईल, अशा अफवा पसरल्यावर मी अटकेला प्रतिबंध केला, असा दावा मलिक यांनी केला. (The central government should guarantee a MSP, says Meghalaya Governor Satya Pal Malik)शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्या देशाला वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे लष्कर आणि शेतकरी समाधानी ठेवले गेले पाहिजेत, असे सांगून मलिक यांनी शेतकऱ्यांना दुखवू नका’, असे आवाहन मोदी आणि शहा यांना केले.

शेतकरी दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे-    शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्याचे वर्णन करून सत्यपाल मलिक म्हणाले, ‘दिवसेंदिवस ते गरीब होत चालले आहेत तर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दर तीन वर्षांनी वाढत आहे. शेतकरी जे पेरतो ते स्वस्त आणि तो जे काही विकत घेतो ते महाग. आपण गरीब कसे होत आहोत हे त्याला कळत नाही. 

-    शेतकऱ्यांचे वाटोळे त्यांना काही न समजता होत आहे.-    शेतकरी जेव्हा बी पेरायला जातो तेव्हा त्याला त्याचे पैसे मोजावे लागतात आणि तो जेव्हा ते पीक कापायला जातो तेव्हा त्याचा भाव जवळपास ३०० रुपयांनी खाली आलेला असतो, असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार