शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 16:05 IST

केंद्र सरकारने हॅकिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याची भीती व्यक्त करत स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे

ठळक मुद्देकेंद्र सरकारने चीनी स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहेचीनी मोबाईल कंपन्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट चोरत असल्याची भीतीअॅप्पल, सॅमसंगसहित भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सलाही नोटीस पाठवण्यात आली आहे

नवी दिल्ली, दि. 16 - केंद्र सरकारने हॅकिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याची भीती व्यक्त करत स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये विवो, ओप्पो, शिओमी आणि जिओनी या चीनी कंपन्यांचा समावेश आहे. मोबाईल फोन मेकर्स कंपन्या हँकिंग करत असल्याची भीती केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्व: चीनी मोबाईल कंपन्या रडारवर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

चीनी मोबाईल कंपन्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट चोरत असल्याची भीती केंद्र सरकारला वाटत आहे. केंद्र सरकारकडून एकूण 21 मोबाईल कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये फक्त चीनी कंपन्यांचा समावेश नसून भारतीय कंपन्याही उल्लेख आहे. अॅप्पल, सॅमसंगसहित भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

'सर्व कंपन्यांना सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं आहे की नाही याची माहिती देण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. सर्वांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी आम्ही ऑडिट करणार आहोत', अशी माहिती अधिका-याने दिली आहे. केंद्र सरकारने अशावेळी हे पाऊल उचललं आहे जेव्हा भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन वाद सुरु आहे. 

भारत सर्व आव्हानांचा सामना करण्यास तयार, डोकलाम वादावर मोदींचा चीनला इशाराविशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनादिवशी केलेल्या आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचं नाव न घेता भारत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं होतं. मग ते आव्हान समुद्री भागातून असो अथवा सीमेवरुन, भारत सर्व आव्हानांशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं पंतप्रधान मोदी बोलले होते. मोदींनी यावेळी चीनचा उल्लेख न करता हा इशारा दिला होता. देशाची सुरक्षा आपल्या सरकारची प्राथमिकता असून, सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी जवनांना तैनात करण्यात आल्याचंही ते बोलले होते. 

डोकलाम वादात मंदावणार मेट्रोचा वेग?डोकलाम वादावर भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चीनसोबत करण्यात आलेला नागपूर मेट्रो रेल्वेसाठी कोच खरेदी आणि कारखाना निर्मितीचा करार रद्द होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोची ‘स्पीड’ मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने उच्चस्तरीय वर्तुळात हालचाली सुरू झालेल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या वादावर पूर्णविराम लागल्यास मेट्रो रेल्वेच्या मार्गात निर्माण होवू पाहणार हा अडथळा लवकरच दूर होईल, असेही ‘मेट्रो रेल्वे’च्या उच्चपदस्थ वर्तुळात बोलले जात आहे.