शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा दुजाभाव? निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीच्या मदतीपोटी दिले केवळ २६८ कोटी

By बाळकृष्ण परब | Updated: November 13, 2020 14:21 IST

Cyclone Nisarga News : निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

ठळक मुद्दे नुकसानीच्या मदतीपोटी महाराष्ट्राला केवळ २६८.५९ कोटी रुपयांची मदत जाहीर महाराष्ट्राने १ हजार ४० कोटींची मदत मागितली असताना कमी मदत देण्यात आली तर पश्चिम बंगालला २ हजार ७०७.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे

नवी दिल्ली - यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेमहाराष्ट्रातील कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता केंद्र सरकारने निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी महाराष्ट्राला केवळ २६८.५९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी मदत म्हणून केंद्र सरकारने सहा राज्यांना ४ हजार ३८१ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल, ओदिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम अशा एकूण सहा राज्यांना ही मदत देण्यात येणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ही मदत मंजूर केली आहे.यामध्ये अम्फान चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही निसर्ग चक्रीवादळाने मोठी हानी घडवून आणली होती. त्यामुळे मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालला २ हजार ७०७.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर ओदिशाला १२८.२३ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्रासारख्या राज्यांना अम्फान निसर्ग यांसारख्या वादळांनी तडाखा दिला. तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांना पुराचा सामना करावा लागला. तसेच सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. गृह मंत्रालयाद्वारे ही मदत नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडांतर्गत मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २६८. ५९ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्राने १ हजार ४० कोटींची मदत मागितली असताना कमी मदत देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याचप्रमाणे पुरामुळे नुकसान झालेल्या राज्यांनाही मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकला ५७७.८४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशला ६११ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूस्खलनामुळे नुकसानीचा सामना करणाऱ्या सिक्कीमला ८७.८४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळMaharashtraमहाराष्ट्रCyclone Amphanअम्फान चक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालCentral Governmentकेंद्र सरकार