शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकार काढणार सामाजिक सुरक्षा वटहुकूम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 07:10 IST

वेतन न मिळाल्याच्या अनेक तक्रारी; कामगार कपात टाळण्यासाठीचा उपाय

नवी दिल्ली : केंद्र सरकार मध्यम आणि लहान क्षेत्रासह औद्योगिक कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी अध्यादेश काढण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसायविषयक आरोग्य व सुरक्षिततेचे सध्या वेगवेगळे असलेले कायदे एकच केले जातील. कामगारांना वेतन न देणे, मालकांकडून हितरक्षणही न होणे, अशा भरपूर तक्रारी सध्या येत आहेत. या तक्रारी रोजंदारीवरील कामगारांशिवायच्या आहेत.

कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणावर कामगार कपात होऊ नये (ती झाल्यास मोठा सामाजिक असंतोष निर्माण होईल) म्हणून हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सरकारला जाणवले. सध्या १० दशलक्षांपेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना राज्याराज्यांत निवारागृहांत राहावे लागत आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था सरकार तसेच स्वयंसेवी संस्था करीत आहेत.देशात ९० टक्के कामगार असंघटितसंघटित क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या कामगारांना कामावरून तात्पुरते दूर(ले आॅफ) करण्याचा पर्याय त्यांची कायदेशीर देणी दिल्यानंतर उपलब्ध आहे. परंतु, भारतात ९० टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रातील असून ते सामाजिक सुरक्षेशी संबंधित कामगार कायद्यांच्या कक्षेत येत नाहीत.परंतु, अशा चार प्रस्तावांपैकी हा पहिलाच आहे. श्रम मंत्रालयाने ४४ कामगार कायदे चार कायद्यांत (वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती) एकत्र करण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMIDCएमआयडीसी