शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : ७४ काेटी डोससाठी केंद्र सरकारने दिल्या ऑर्डर, लसीकरणासाठी ५० हजार काेटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 07:16 IST

Corona Vaccination : केंद्राने या माेहिमेसाठी ७४ काेटी डाेससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवी दिल्ली:  देशातील संपूर्ण काेराेना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वत:कडे घेत असल्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली. या माेहिमेसाठी तब्बल ५० हजार काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्राने या माेहिमेसाठी ७४ काेटी डाेससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काेराेना लसीकरण माेहिमेत १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे पंतप्रधान माेदींनी साेमवारी जाहीर केले हाेते. या माेहिमेबाबत अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली. सरकारकडे लसीकरणासाठी पुरेसा निधी असून, तत्काळ कुठल्याही पुरवणी निधीची गरज नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कदाचित दुसऱ्या टप्प्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुमारास गरज भासू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. लसीकरण माेहीम सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि बायाे-ई या कंपन्यांवर केंद्रित असून, बहुतांश लाेकसंख्येला त्यातून लसी देता येतील, अशी  अपेक्षा सूत्रांनी वर्तविली आहे.

परदेशी लसींवर अवलंबन नाहीदेशाच्या लसीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशी लसींवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचेही अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. फायझर आणि माॅडर्ना या कंपन्यांच्या लसी सध्यातरी भारतात उपलब्ध हाेण्याची शक्यता नाही. भारतातील अटींबाबत चर्चा सुरूच आहे. तसेच जानेवारीपर्यंत माॅडर्नाची भारतात प्रवेश करण्याची याेजना नाही. स्पुतनिक-व्ही या रशियन लसीला भारतात मंजुरी मिळाली आहे. मात्र, माेठा साठा उपलब्ध हाेण्याची शक्यता कमीच आहे. केंद्राने ही लस खरेदी करण्यास अद्याप सुरुवातही केलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

७४ काेटी डाेससाठी ऑर्डर्ससंपूर्ण लसीकरणासाठी केंद्र सरकारने ७४ काेटी डाेससाठी ऑर्डर्स दिल्या आहेत. काेविशिल्डचे २५ काेटी, काेव्हॅक्सिनचे १९ काेटी आणि बायाेलाॅजिकल-ई या कंपनीच्या लसीचे ३० काेटी डाेस खरेदी करणार असल्याची माहिती डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी दिली. त्यापैकी काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनचे ४४ काेटी डाेसचा पुरवठा तातडीने सुरू हाेणार असून, सर्व डाेस डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यात उपलब्ध हाेणार आहेत. त्यासाठी ३० टक्के आगावू रक्कम ‘सीरम‘ आणि भारत बायाेटेकला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बायाेलाॅजिकल-ई या कंपनीच्या लसीची किंमत किती असेल, यासाठी आपण प्रतीक्षा करू, असेही डाॅ. पाॅल यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या