शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

देशातल्या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला मान्यता, 2.14 लाख हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 10:24 IST

बिहार सरकार राज्यातील कोसी आणि मेची या दोन नद्यांना एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पटनाः बिहार सरकार राज्यातील कोसी आणि मेची या दोन नद्यांना एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्याच्या या परियोजनेला केंद्र सरकारनंही मंजुरी दिली आहे. या परियोजनेसाठी जवळपास 4900 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मध्य प्रदेशमधल्या केन-बेतवा नदीनंतर देशातल्या नद्यांना एकमेकांशी जोडण्याच्या या दुसऱ्या मोठ्या परियोजनेला केंद्रानं मान्यता दिली आहे. बिहारच्या जलसंसाधन मंत्री संजय कुमार झा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.संजय कुमार झा यांनी सांगितलं की, बिहारला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं या योजनेला मंजुरी दिली आहे. बिहार सरकारच्या जलसंसाधन मंत्र्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारनं या सिंचनासाठी कोसी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर 76.20 किलोमीटर लांब कालवा तयार करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमुळे कोणत्याही लोकांचं विस्थापन केलं जाणार नाही. ही योजना यशस्वी झाल्यास बिहार हा पूरमुक्त होणार आहे. तसेच अररिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार जिल्ह्यातील 2.14 लाख हेक्टर कृषी क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.  

टॅग्स :riverनदीBiharबिहार