शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:08 IST

Soft Porn Content Apps Ban in India: भारतात कोरोना काळात पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास विविध कंपन्यांनी सुरुवात केली होती. यात उल्लू अ‍ॅप, एएलटीटी सारख्या अ‍ॅप्सनी धुमाकूळ घातला होता.

केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे आंबटशौकिन चांगलेच अडचणीत आले आहेत. उल्लू अ‍ॅप, एएलटीटी, डेसिफ्लिक्स आणि बिग शॉट्स सारख्या सेमी पॉर्न प्रसारित करणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 

भारतात कोरोना काळात पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास विविध कंपन्यांनी सुरुवात केली होती. यात उल्लू अ‍ॅप, एएलटीटी सारख्या अ‍ॅप्सनी धुमाकूळ घातला होता. तरुण वर्गासह सर्वच वयोगटाला या अ‍ॅप्सनी भुरळ घातली होती. यामुळे तरुण पिढी देखील बिघडत चालली होती. याला आवर कसा घालावा, असा प्रश्न केंद्र सरकारसमोर होता. यावर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

इंटरनेट सेवा प्रदात्यांना देशभरात अशा प्रकारची सामग्री दाखवणाऱ्या २५ वेबसाइट तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सरकारने सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ७९(३)(ब) व आयटी नियम, २०२१ च्या नियम ३(१)(ड) नुसार कारवाई केली आहे. इंटरनेट प्रोव्हायडरना मध्यस्थ घोषित करण्यात आले आहे. त्यांच्यावरच ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

या अ‍ॅप, वेबसाईटचा आहे समावेश...एएलटीटी, उल्लू, बिग शॉट्स अ‍ॅप, डेसिफ्लिक्स, बूमेक्स, नवरासा लाईट, गुलाब अ‍ॅप, कंगन अ‍ॅप, बुल अ‍ॅप, जलवा अ‍ॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अ‍ॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स या सॉफ्ट पॉर्न दाखविणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्यात आली आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार