शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या सूचनेवर माेदींची माेहोर; कोरोना विषाणूवरील बूस्टर डाेसला केंद्र सरकारची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 05:27 IST

Rahul Gandhi : या सूचनेवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी रात्री राष्ट्राला केलेल्या संबाेधनात अंमल केला.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी काही काळाने माेदी सरकारला करावी लागत आहे. काेराेना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बूस्टर डाेस देण्याची परवानगी देण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली हाेती. या सूचनेवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी रात्री राष्ट्राला केलेल्या संबाेधनात अंमल केला.गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आधीसूचना करतात व त्याच सूचनांवर केंद्र सरकार अंमल करीत असल्याचे दिसत आहे. 

सर्वांचे लसीकरणसरकारने आधी ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लाेकांसाठी लसीकरण बंधनकारक केले हाेते. यावर राहुल गांधी यांना सर्वांचे लसीकरण करा, अशी सूचना केली हाेती. काही महिन्यांनी केंद्र सरकारने सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. 

कृषी कायदे मागेकेंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कृषी कायदे संमत केले हाेते. हे कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागतील, ताेपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, असे केंद्र सरकारला राहुल गांधींनी सुनावले हाेते. याची प्रचिती एक वर्षाने आली. 

बूस्टर डाेसची मागणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या २२ डिसेंबरला ट्विट करून बुस्टर डाेस देण्याची मागणी केली हाेती. देशातील बहुसंख्य लाेकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. केंद्र सरकार बुस्टर डाेस केव्हापासून सुरू करणार? अशी विचारणा ट्विटद्वारे केली हाेती. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी बुस्टर डाेस देण्याची घाेषणा केली. याबाबत रविवारी राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस